तुमच्या शब्दातून तुमचे आयुष्य घडत असते…
वृत्त निवेदिका दिपाली केळकर यांचे प्रतिपादन
![]()
तुमच्या शब्दातून तुमचे आयुष्य घडत असते…
वृत्त निवेदिका दिपाली केळकर यांचे प्रतिपादन
मराठी वाड्:मय मंडळ आप्पासाहेब प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर आयोजित तिसरे पुष्प शारदीय व्याख्यानमाला संपन्न..




अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शब्दांचा अर्थ समजणे व जाणून घेणे हे महत्त्वाचे असते तर कधीकधी अर्थाचा अनर्थ होतो, निघतो किंवा काढलाही जातो, मग भलताच प्रसंग ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय ते शब्द कोण बोलत आहे, कुठल्या परिस्थितीत उच्चारला तो शब्द यालाही खूप महत्त्व येते. शब्द खूप काही देऊन जातात आपल्याला असे सांगत तुमच्या शब्दातून तुमचे व्यक्तिमत्व घडते
असे मराठी वाड्:मय मंडळ आप्पासाहेब प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत शिवाजी महाराज नाटयसभागृहात वृत्त निवेदीका दिपाली केळकर बदलापूर ‘शब्दांच्या गांवा जावे’ या विषयावर बोलतांना सांगितले..
व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील व मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक श्याम पवार यांनी केला… कार्यक्रमात देणगीदार दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला..सुत्रसंचालन सौ वसुंधरा लांडगे यांनी केले..
वृत्त निवेदिका दिपाली केळकर पुढे म्हणाल्या की शब्दाचे पण व्यक्तीमत्व असते,गावाचेपण व्यक्तिमत्व असते..
अमळनेर म्हणजे अगत्यशिलता होय..असे सांगितले..
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।। तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा करू।।’ देवाने माणसाला विचार करण्याची क्षमता दिली आणि त्याचबरोबर अभिव्यक्त होण्यासाठी शब्दशक्ती बहाल केली आहे..
शब्द नसतील तर काय होणार, कल्पना करू शकत नाही, जीवनात पाच सी महत्त्वाचे पण एक सीमुळे संवाद कमी झाला, कविता म्हणजे शब्दाचा झिलमा..
शब्दात,राग तसा त्यामुळे तसे माणसाचे व्यक्तिमत्त्व असते तसे शब्दाला..
रंग,रूप वेगळा असतो.. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात माहेर..जेथे मायचा आहेर मिळतो, पण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असतात..आयुष्य म्हणजे आनंद,दुसरा अर्थ संघर्ष म्हणजे
तुमच्या शब्दातून तुमचे आयुष्य घडत असते…वंदे मातरम,जय जवान जय किसान,जय शिवाजी जय भवानी, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मिळावणारच… या शब्दानी इतिहास घडवला. शब्दाचे उदाहरण देतांना म्हणाल्या व्हिटोरीया दार उघड यात अंहकार आहे पण मी तुझी पत्नी आहे यात प्रेम,विनंती आहे. शब्दाचा जसा अर्थ फिरवला तसा अर्थ बदलतो शब्दाना पण स्वभाव असतात, बरं,जावू दे,बघू-पण हे शब्द धुर्त आहेत..सकारात्मक होकार देतात..वजनदार,खबरदार ,हे शब्द शुर
मोह पाडणारे शब्द-शब्द, मोफत
काही शब्द खोडा घालणारे असतात..
सांस्कृतिक संचालनालय हा शब्द नुसता म्हणायला तसा काही कठीण नाहीये पण एखाद्या वाक्यात आला की काहीतरी गडबड होऊ शकते आणि पुढे घरी जाऊन तुम्ही प्रयत्न करा, रानडे रोड हा साधा शब्द वाटतो आपल्याला पण रानडे रोड हा शब्द सलग अडव्याला म्हणाला गेलात ना गतीने गडबड होते रानडे रोड त्याचे अनेक शब्द आहेत काही शब्द असे असतात ना ते ध्वनीतून निर्माण होतात ते शब्दकोशामध्ये नसतात ते ध्वनीतून निर्माण होतात
थँक्यू आभारी आहे, अभिनंदन आणि सॉरी क्षमस्व आणि प्लीज माझे हे काम करा ,माझे हे काम करा आणि प्लीज माझं हे काम करा म्हटल्यानंतर लगेच समोरचा माणूस करतो ना त्यामुळे प्लीज, थँक्यू ,आभारी आहे.. अभिनंदन कृपया ते थोडे शब्द जड वाटतात त्या मला नेहमी इंग्रजी शब्द थोडेसे आपल्याला लवचिक वाटतात त्यामुळे आपण पटकन ते इंग्रजी शब्द वापरतो त्यामुळे हे सौजन्यशील शब्द आहेत जसे माणसाचे नशीब असते तसे शब्दाचे असते……
ओळखलंत का सर मला?” पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलाला वरती पाहून,
गंगामाई आली पाहुणी, गेली घरट्यात राहून,
ही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.
कणा या कुसुमाग्रज यांच्या कवीतेतून शब्द लढण्याचे सामर्थ्य देतात..तर पाडगावकर यांच्या कवितेतून शब्दाचे सामर्थ्य कळते..शब्दाची जागा बदलली तर अर्थ बदलतात.. जसे पितळी मोरीची घासणी हे चुकीचे आहे ते असे हवे मोरीची पितळी घासणी असे हवे..
माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणणार नाही ,माझी तुझ्यावर प्रीती आहे असं म्हणे म्हटलं काय प्रीती म्हटलं काय पडतो छान उत्तर दिलं त्यांनी असं सांगितलं जेव्हा आपण प्रेम हा शब्द उच्चारतो ना तेव्हा मात्रेमुळे ओठ विलग होतात आणि प्रीती हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा वेलांटी मुळे एकत्र येतात प्रेम मध्ये विलग होणं आहे प्रीती मध्ये एकत्र येणे आहे.ते सांगत एक अक्षरी शब्द-७१ आहेत. म्हणजे प्रश्नार्थक किंवा संबोधनात्मक त्यामुळे एकाक्षरी शब्द पण वेगवेगळ्या भूमीकेत वावरतात.निवेदीका केळकर मँडम यांनी शब्दांचे सामर्थ्य काय असते? अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत वृत्त निवेदिका केळकर यांनी मांडल्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले व शेवटपर्यंत प्रतिसाद दिला..
मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डाँ अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाने, रमेश पवार, कार्यवाहक सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे व कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा डाँ पी.बी भराटे,
संदीप घोरपडे, प्रा डॉ सुरेश माहेश्वरी,
सौ वसुंधरा लांडगे, प्रा श्याम पवार ,श्रीमती स्नेहा एकतारे, बन्सीलाल भागवत, भैय्यासाहेब मगर, प्रा शीला पाटील, बजरंग अग्रवाल, अजय केले यांनी प्रयत्न केले..
चौकट
वृत्त निवेदीका दिपाली केळकर यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन करणाऱ्या वाड्:मय मंडळाच्या सदस्या सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांनी दिलेल्या शब्दावरून बरोबर गीत सादर केल्यामुळे त्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला.



