प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद
![]()

प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद
अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे गणित व संख्याशास्त्र विभाग अंतर्गत २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गणित व संख्याशास्त्र विषयाचे एकूण शोधनिबंध व २५ पोस्टर प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रस्तुत परिषदेचे बीजभाषक डॉ.एन.के.ठाकरे (माजी कुलगुरू क.ब.चौ.उ.म.वि जळगाव), संसाधन व्यक्ती म्हणून गणित विषयासाठी डॉ.एच.एस.रामणे (धारवाड), डॉ.एस.आर.चौधरी (क.ब.चौ.उ.म.वि,जळगाव), डॉ.विश्वास खरे (एसएसआर एएससी कॉलेज, सिल्वासा) आणि संख्याशास्त्र विषयासाठी डॉ.व्ही.ए.कळमकर (बडोदा विद्यापीठ), डॉ. व्ही. बी. घुटे (पी.ए.एच.एस, विद्यापीठ, सोलापूर), डॉ. आर. एल. शिंदे (क.ब.चौ.उ.म.वि, जळगाव) आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन सत्र श्री राणे सभागृह सभागृहात संपन्न होणार आहे. शोधनिबंधाचे सादरीकरण दुसऱ्या सत्रात दोन्ही सभागृहात सुरु असेल. अधिकाधिक सहभागाचे आवाहन खा.शि.मंडळाचे सर्व पदाधिकारी, मा.प्राचार्य डॉ. ए. बी. जैन व संयोजकांनी केले आहे.

