1 min read

ज्ञान जीवनाची ओळख निर्माण करते
कवी विलास मोरे

Loading

ज्ञान जीवनाची ओळख निर्माण करते
कवी विलास मोरे
असोदा- जीवनाच्या सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शालेय जीवनातले संस्कार आणि मिळालेले ज्ञान हे आपल्या जीवनाची ओळख निर्माण करत असल्याचे मत राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार प्राप्त कवी विलास मोरे यांनी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आज पहिले पुष्प गुंफतना आपले मत व्यक्त केले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, ज्येष्ठ शिक्षक डी.जी. महाजन उपस्थित होते.कवी विलास मोरे यांच्या हस्ते शारदा मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कवी विलास मोरे यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्त्व, साहित्याचे जीवनातील महत्त्व, भाषेचे अनन्य साधारण महत्व,वेळेचे महत्व,श्रमाचे महत्त्व, अभ्यासाचे महत्त्व, कवयित्री बहिणाबाईंच्या साहित्याचे महत्त्व, गुरूंचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच स्व कवितांचे वाचन करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.वृक्षाचे महत्त्व, गुरु-शिष्याचे नाते “कणा” या कवितेतून स्पष्ट केले. दहावी अ च्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.भूपाळी गीत सायली चौधरी,हर्षदा सपकाळे,पल्लवी कोळी,मिताली भारूळे,चैताली वानखेडे तर शारदामातेची प्रार्थना,भाग्यश्री चौधरी,हेमांगी कोळी,खुशी कोळी तसेच स्वागत गीत आदिती कोल्हे,प्रमिता बिऱ्हाडे,दिपाली कोळी,जागृती वाणी,नेहा नेहेते,जोगवा गीत चैताली वानखेडे,पल्लवी कोळी,मिताली भारूळे,सायली चौधरी,हर्षदा सपकाळे या विद्यार्थिनींनी सादर केले.सागर शिरसाळे,धनपाल कोळी,छायेश भोळे,सार्थक माळी,चेतन कुंभार,खिलेश कोल्हे ,यश सोनवणे ,गणेश माळी,रोहन नारखेडे,राजवीर कोळी, वरूण नन्नवरे,
देवेंद्र पाटील या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक मंडळ प्रमुख के. बी. तायडे,सूत्रसंचालन उत्कर्षा भोळे तर आभार पल्लवी कोळी हिने मानले. कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *