शाळा हे संस्कारांचे माहेर असते–
विद्या गायकवाड
![]()


शाळा हे संस्कारांचे माहेर असते–
विद्या गायकवाड
शालेय जीवनात शिक्षक आणि शाळेच्या माध्यमातून होणारे संस्कार जीवनाला घडवणारे असतात भारतीय समाज जीवनात महापुरुषांनी घडवलेला इतिहास हा त्यांनी घेतलेल्या ज्ञानाच्या बळावर असून जीवनात मोठमोठी स्वप्न पाहत असताना ती कृतीत येण्याकरता प्रयत्न होणे गरजेचे असून शाळा हे संस्काराचे माहेर असून या माहेराच्या आठवणी चिरकाल टिकणाऱ्या असतात असे मत जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांनी सार्वजनिक विद्यालय आसोदा येथील शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या प्रसंगी दुसरे पुष्प गुंफताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शुभांगीनी महाजन मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,सांस्कृतिक विभागाचे प्रमुख के.बी.तायडे, ज्येष्ठ शिक्षक डी.जी. महाजन, एस.के.राणेराजपूत उपस्थित होते.डॉ.विद्या गायकवाड पुढे म्हणाल्या आयुष्यात काय करायचे ते प्रथम ठरवा आणि त्यानुसार नियोजन करा पुढचं जग संपूर्णपणे स्पर्धेचे असून त्यासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यासारखे आदर्श आपल्या जीवन घडविण्याला प्रेरक असू शकतात असे मत देखील त्यांनी याप्रसंगी मांडले. विद्यालयाच्या कबड्डी संघाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल मा. विद्या गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थी व क्रीडा शिक्षक पी. जी. कोल्हे, डी.जी. महाजन यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सादिया पिंजारी या विद्यार्थिनीने केले तर भूपाळी, फाल्गुनी कोल्हे, गायत्री चौधरी, साक्षी पाटील, तेजस्विनी ढाके यांनी सादर केली. स्वागत गीत दिक्षा चौधरी, दिव्या मगरे, ख़ुशी अहिरे, योगिता माळी यांनी गायिले. ईशस्तवन गायत्री सपकाळे, दिक्षा पाचपांडे यांनी तर जोगवा प्रांजल कोळी, रुपाली सोनवणे यांनी सादर केला. प्रमुख अतिथिंचा परिचय वर्गशिक्षक एस. के. राणेराजपूत यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन विशाल गंगावणे या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नयन पाटील, वेदांत चौधरी, हर्षल शिंपी, हर्षल वारुळे, अविनाश बाविस्कर, मिताली चौधरी, भाग्यश्री कोळी, शीतल भालेराव इ. विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद महाजन , जितेश गायकवाड,नितीन नारखेडे यांनी परिश्रम घेतले

