1 min read

सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचून साजरा केला वाचन प्रेरणा दिन.

Loading

सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचून साजरा केला वाचन प्रेरणा दिन.

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी वृत्तपत्राचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत विविध वृत्तपत्र विद्यार्थ्यांना देऊन वाचन करायला लावले.वृत्तपत्रातून केवळ बातम्याच नाही तर विविध घडामोडी व प्रेरणादायी लेख सुद्धा असतात असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले .इयत्ता दहावीचा विद्यार्थी शंतनु शिवाजी पंडित या विद्यार्थ्याने अब्दुल कलामांच्या वेशभूषेत मी अब्दुल कलाम बोलतोय माध्यमातून वाचन हे आयुष्य घडविणारे असते शरीराला आकार देण्याचे काम करते असे सांगितले इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक गणेश पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *