1 min read

जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वतीने कंत्राटीकरण व शाळा दत्तक योजना संबंधी शासनाने जाहीर केलेले निर्णय रद्द करणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन

Loading

जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वतीने कंत्राटीकरण व शाळा दत्तक योजना संबंधी शासनाने जाहीर केलेले निर्णय रद्द करणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा सौ.सुप्रियाताई सुळे (खासदार)यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या वतीने मा.अँड.रोहिणीताई खडसे (कार्याध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली मा.श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी जळगाव ) व्दारे शालेय शिक्षण मंत्री मा.दिपकजी केसरकर यांना निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनातील प्रमुख मागण्या
१) कंत्राटी पध्दतीने शिक्षक भरती आदेश रद्द करण्यात यावे.
२) समुह शाळा विकसित करणारे निर्णय रद्द करून राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील ,वाड्या वस्ती वरील शाळांना संरक्षण देण्यात यावे.
३)राज्याच्या अर्थ संकल्पात शिक्षणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी.
४) विद्यार्थ्यांना गुणवत्ता पु्रक शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याचे धोरण रद्द करण्यात यावे.
५) शासनाकडे थकित असलेले शैक्षणिक संस्थांचे वेतनेतर अनुदान ,RTE अनुदान अदा करण्यात यावे.
६) विना अनुदान व अंशतः अनुदानीत शाळांना १००% अनुदान देण्यात यावे.
७) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी.
८) कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
अशा प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी माजी.आमदार डॉ. सुधीर तांबे ,सौ.जयश्रीताई महाजन माजी महापौर जळगाव,संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. जयवंतरावआबा पाटील,शिक्षक संघाचे सेक्रटरी भिरूड सर, सरचिटणीस श्री. संजय सोमाणी, चिटणीस मा.श्री. शकिल पटेल, सभासद श्री. अशोक बडगुजर, श्री. निलेश खलसे बारी,श्री. शैलेश राणे,श्री. राजेंद्र महाजन,श्री. सुनील गरूड सर आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *