समाजकेंद्री संशोधन काळाची गरज :डॉ. प्रशांत अमृतकर यांचे प्रतिपादन
![]()

समाजकेंद्री संशोधन काळाची गरज :डॉ. प्रशांत अमृतकर यांचे प्रतिपादन
प्रताप महाविद्यालयात सामाजिकशास्त्रे विभागाच्या वतीने राष्ट्रीय परिषद संपन्न
अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दिनांक १६ रोजी रुसा अंतर्गत सामाजिकशास्त्रे विभागाच्या वतिने समकालीन घटनात्मक मुद्द्यांवर एकदिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ए.बी.जैन होते. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, संचालक योगेश मुंदडे, चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव,आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य डॉ. जी. एच.निकुंभ, प्रा. कल्पना पाटील, प्रा.डॉ.जयंत पटवर्धन, प्रा. डॉ. विजय मांटे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. सोनवणे, महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक तसेच भारताच्या विविध विद्यापीठातून(गुजरात,राजस्थान) आणि महाविद्यालयातून आलेले संशोधक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संशोधन शोधनिबंधाच्या जर्नलचे प्रकाशन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात बीजभाषक म्हणून डॉ.प्रशांत अमृतकर (छत्रपती संभाजीनगर) हे होते. ते यावेळी म्हणाले की, “समाजकेंद्री संशोधन काळाची गरज आहे. शिवाय काळाची पाऊले ओळखून सामाजिकशास्त्रे या शाखेतून दर्जेदार संशोधन होणे गरजेचे आहे,असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मनोजकुमार साळी (नाशिक), डॉ. बीना शेंगर (संभाजीनगर),डॉ.बाळासाहेब पाटील(मुंबई),डॉ.जगतराव धनगर(गुजरात) यांनी आपले संशोधनपर पेपर सादर केले.
तिसऱ्या सत्रात डॉ.देवेंद्र विसपुते(धुळे),डॉ.संजय भोळे(शेंदूर्णी) हे सत्राध्यक्ष म्हणून होते. तर अतिथी वक्ते म्हणून डॉ.संतोष खत्री, डॉ.रमेश शेवाळे, डॉ.जयेश पाडवी यांनी सादरीकरण केले.
समारोपीय सत्राचे अध्यक्ष संस्थेचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल होते. यावेळी अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय शिंदे,डॉ.शरद पाटील यांच्या उपस्थितीत समारोपीय समारंभ संपन्न झाला.प्रस्तुत प्रसंगी डॉ.माधव वाघमारे(नंदुरबार),डॉ.मनिष करंजे(पारोळा),प्रा.यादव बोयेवार(दोंडाईचा) यांनी राष्ट्रीय परिषदे संबंधी अभिप्राय दिला.
या राष्ट्रीय परिषेदेचे संयोजन उपप्राचार्य डॉ.जी.एच.निकुंभ, संयोजक डॉ.विजय तुंटे, डॉ.एच.डी.जाधव, रेक्टर डॉ.अमित पाटील,डॉ.संदीप नेरकर, डॉ. व्ही. बी. मांटे, डॉ.धीरज वैष्णव, डॉ. डी. आर. चौधरी, डॉ.माधव भुसनर, प्रा.देवेंद्र मराठे,प्रा.प्रशांत ठाकूर,प्रा.डॉ. रवींद्र मराठे, प्रा.विजय साळुंखे, प्रा.अवित पाटील, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा. सुनील राजपूत, डॉ.बालाजी कांबळे,प्रा. राखी घरटे, प्रा.प्रसाद मुठे, प्रा.दिलीप तडवी, प्रा नितीन पाटील,प्रा.सचिन आवटे, प्रा.सोनुसिंग पाटील, प्रा.विनोद नाईक,प्रा.मनिषा पारधी,प्रा.प्रदीप पवार, प्रा.प्रियंका चावडा,दिलिप शिरसाठ, दीपक चौधरी, मेहूल ठाकरे,हिमांशू गोसावी,अक्षय सोनार,अमोल अहिरे,आकाश धनगर,प्रेरणा चौधरी,प्रतिमा पाटील आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ. विजय तुंटे यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने अशा संशोधनविषयक परिषेदेची गरज असते असे मत व्यक्त केले तसेच संचालक योगेश मुंदडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत डॉ.ए.बी.जैन यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. कल्पना पाटील, डॉ. रवी बाळसकर, डॉ. डी.आर.चौधरी, यांनी केले तर पहिल्या सत्राचे आभार डॉ. व्ही.बी.मांटे तर समारोपीय सत्राचे आभार समन्वयक डॉ विजय तुंटे यांनी मानले.

