1 min read

अहिराणी एक समृद्ध बोलीभाषा आहे तिचा ठेवा जपा
-साहित्यिक देविदास हटकर (ठाणे)

Loading

अहिराणी एक समृद्ध बोलीभाषा आहे तिचा ठेवा जपा
-साहित्यिक देविदास हटकर (ठाणे)

अमळनेरला खानदेश ,खानदेशी साहित्यिक व अहिराणी साहित्य या विषयावर शारदीय व्याख्यानमाला संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
बोली मनी अहिराणी, जशी दहिमान लोणी| सगया ताकना पारखी, इन्ही पारख कई कोणी| अहिराणी हि एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी आहेत. हा सांकृतिक ठेवा जपणे हि आज काळाची गरज आहे. अहिराणी / खान्देशी साहित्य आणि परंपरेचा अनमोल ठेवा आहे अहिराणी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी खान्देशातील लोकांनी प्रचार प्रसार करावा असे मराठी वाड:मय मंडळ आप्पासाहेब प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेत अमळनेरला शिवाजी नाट्य सभागृहात बापू उर्फ देविदास हटकर (ठाणे) खानदेश व खानदेशी साहित्यिक व अहिराणी साहित्य यावर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतांना बोलत होते…
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विजय गणेश कुडे निवृत्त अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी वांग्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी होते..
खान्देशी साहित्यिक-बापू उर्फ देवीदास शंकर हटकर व प्रमुख पाहुणे यांचा परीचय मराठी वाड्:मय मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत यांनी केला.
साहित्यिक देविदास हटकर म्हणाले की
उत्तर महाराष्ट्राचे जळगांव, धुळे, नंदूरबार हे जिल्हे खानदेश म्हणून आजही ओळखले जातात. पूर्वी मुंबई इलाख्याचे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश हे दोन भाग होते. पुढे हा भूभाग जळगांव, धुळे आणि नासिक या जिल्ह्यंच्या नावाने ओळखला जाऊ लागला. खानदेश हा परिसर पूर्वेला वाघूर नदी, पश्चिमेला चांदवडचे डोंगर, उत्तरेला सातपुडा पर्वताच्या उंचउंच रांगा आणि दक्षिणेला िवध्याद्री पर्वताच्या रांगा यांनी वेढलेला आणि दळणवळणाच्या दृष्टीने इतर भूभागापासून तुटलेला असा प्रदेश होता. हा भूप्रदेश म्हणजे खानदेश आणि या परिसरात बोलली जाणारी बोली ही खानदेशी. खानदेशी ही या प्रदेशाची बोली जी या प्रदेशातील सर्व जातीजमातींनी दैनंदिन व्यवहारासाठी स्वीकारली आहे. खानदेश म्हणजे अहिर देश – अहिरांचा देश. आणि अहिरांची बोली ती अहिर असे सांगितले..
अहिराणीचा इतिहासच पाहावयाचा तर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांच्या साहित्यातसुद्धा अहिराणी बोलीचे असंख्य शब्द आढळतात. अहिर हे गोपाळ, गुराखी, गुरे राखणारे. अहिरांचा नंद, गोपाळ म्हणून रामायण महाभारतकालापासून उल्लेख आहेच. अहिरांच्या इतिहासाइतकाच अहिराणीचाही इतिहास हा जुना आहे. खानदेश हे नाव कान्ह देश, कान्हाचा देश, कृष्णाचा देश, किंवा महाभारतकालीन ऋषभदेश यावरून पडले आहे.
खानदेशात आढळणारी विवाह गीते ही खानदेशभर आढळतात. मात्र अशा प्रकारची विवाह गीते इतरत्र आढळत नाहीत. या विवाह गीतातून खानदेशांच्या इतिहासावर, संस्कृतीवर आणि अहिराणी बोलीच्या शब्दसंग्रहांवर प्रकाश टाकता येतो. काही विवाह गीते त्यांनी गायली…
गंगा जमुना दोन्ही खेते
गंगा जमुना दोन्ही खेते
तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय सिताबाई खाते
तठे काय सिताबाई खाते
तठे काय कापुसना बेटे
अशा पद्धतीने अहिराणी गीत सादर खान्देशी साहित्यिक देविदास हटकर यांनी श्रोत्यांना लोटपोट केले…
व्याख्यान मालेत नंदकुमार भांडारकर, जयवंत पाटील, प्रविण मुठे,श्रीमती रजनीताई केले,प्रा.प्रकाश लांडगे, श्यामकांतजी भदाणे, प्रदीप भट,दशरथ सोमा लांडगे, योगेश मुंदडा सह ब-याच देणगीदारांचा व्याख्यानमालेत उदार देणगी दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
अध्यक्षीय भाषणात मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी खान्देशी परंपरा, याबाबत सविस्तर माहिती साहित्यिक हटकर यांनी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी वांग्मय मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर पी.व्ही ब-हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन बन्सीलाल भागवत यांनी मानले… यावेळी दर्दी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते…
कार्यक्रमाचे आयोजक वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डाँ अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाने, रमेश पवार, कार्यवाहक सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे व कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा डाँ पी.बी भराटे,
संदीप घोरपडे, प्रा डॉ सुरेश माहेश्वरी,
सौ वसुंधरा लांडगे, प्रा श्याम पवार ,श्रीमती स्नेहा एकतारे, बन्सीलाल भागवत, भैय्यासाहेब मगर, प्रा शीला पाटील, बजरंग अग्रवाल, अजय केले यांनी प्रयत्न केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *