1 min read

वाचन प्रेरणा दिवस ग्रंथ प्रदर्शनाने साजरा——–!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचा उपक्रम

Loading

वाचन प्रेरणा दिवस ग्रंथ प्रदर्शनाने साजरा——–!

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी येथील उपक्रमशील शिक्षक ईश्वर महाजन सर यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. वाचन प्रेरणा दिवसानिमित्त उपक्रमशील शिक्षक श्री डी. ए. सोनवणे यांनी वेगवेगळे पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सर्व पुस्तकांचे अवलोकन करून वाचन करण्याचा प्रयत्न केला. यावर्षी 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने मराठी भाषेचे प्रसार आणि विकास जतन व संवर्धन करणे हे उद्देश असून त्या निमित्ताने सदरच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कुटुंबातील वेगवेगळे सदस्य, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक यांना आपल्या परीने पुस्तक भेट देऊन हा मराठी भाषेचा वसा आणि वारसा जतन करण्यासाठी प्रेरित केले. सदर प्रसंगी ईश्वर महाजन सर यांना नुकताच शिवसेनेच्या वतीने जळगाव जिल्हा उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले होते. त्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने सचिव सौ. भारती चव्हाण मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ व मुंदडा फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश भाऊ मुंदडा, सचिव नरेंद्र भाऊ मुंदडा, सहसचिव योगेश भाऊ मुंदडा तसेच कार्यकारणी व मुख्याध्यापक संदीप पवार यांच्या वतीने डी. ए .सोनवणे यांनी ईश्वर महाजन सर यांचा सत्कार करून ऋण व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ईश्वर महाजन सर यांनी शालेय विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनी यांना प्रेरित करण्यासाठी उपक्रम का ? आणि कशासाठी? राबविण्यात यावा याविषयी मार्गदर्शन केले. आणि थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी आपण का ? आणि कशासाठी? साजरा करीत असतो याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या कार्याची सविस्तर माहिती मनोगत व्यक्त करताना देण्यात आली. सदरप्रसंगी शिक्षक व्हीं.डी. पाटील, डी. एस माळी, आर. डी. महाजन,वाय. जे. पाटील, ए.पी .जाधव, एम. एस. सुशीर पी.ए.शेलकर, पी.एम. ठाकरे, तसेच शिक्षिका ए .यु.महाजन,व्ही. डी. जाधव, पी.पी. पाटील, सी.डी. निकम, बी. एस. चव्हाण, एस. एस. तेले उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमानंतर चहा पाण्याचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *