1 min read

बाजपेयी सर डोंबिवली स्काऊट गाईड चे खरे शिल्पकार आहेत: नामदार रविंद्र चव्हाण. स्काऊट गाईड चे विद्यार्थी शिस्तप्रिय आणि आज्ञाधारक असतात:शिक्षक आमदारज्ञानेश्वर म्हात्रे

Loading

बाजपेयी सर डोंबिवली स्काऊट गाईड चे खरे शिल्पकार आहेत: नामदार रविंद्र चव्हाण. स्काऊट गाईड चे विद्यार्थी शिस्तप्रिय आणि आज्ञाधारक असतात:ज्ञानेश्वर म्हात्रे

डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड स्थानिक संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “स्वप्नपूर्ती”स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न.
डोंबिवली (प्रतिनिधी)डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड स्थानिक संस्था डोंबिवली
दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड स्थानिक संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “स्वप्नपूर्ती ” 2023 स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पडला. त्यानिमित्ताने शाळेतील चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता तसेच जिल्हास्तरीय गुणवंत स्काऊटर गाईडर पुरस्कार व जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्काऊट गाईड शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे,यांचा हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
विशेष अतिथी म्हणून डॉ.यशवंत म्हात्रे साहेब सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी, माननीय श्री वेणू गोपाल के एज्युकेशन सेक्रेटरी केरलिय समाज, माननीय सौ प्रेरणा राजकुमार कोल्हे मॅडम सचिव जानवी मल्टी फाउंडेशन डोंबिवली
आरएसपी कमांडर डॉ. मनिलाल शिंपी आरएसपी कमांडर, किरण लहाने जिल्हा संघटक स्काऊट , सौ हेमांगी पाटील जिल्हा संघटक गाईड तसेच श्री गजानन पाटील मुख्याध्यापक जे के पाटील इंग्लिश स्कूल, सौ विजयालक्ष्मी शेट्टी मुख्याध्यापिका ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल, सौ सुरेखा पंडित मॅडम मुख्याध्यापिका मंजुनाथ इंग्लिश मीडियम स्कूल , सौ रेखा पुंणतांबेकर मॅडम , सौ बिना अय्यर, किशोर पाटील, महेंद्र भोईर अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्यागिक विभाग दिनेश खरोटे माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विभाग, श्री परदेशी, मुख्याध्यापक डी एन सी स्कूल अरविंद तिवारी मुख्याध्यापक आरटीपी हिंदी स्कूल, वसंत जोहारे, आर के महाजन सर, अशोक जगताप, जगदीश उगले, एकनाथ चौधरी, नरेंद्र राणे, राजेन्द्र शेटे, सुनील भावसार, जितेश पाटील, राजू घुले, प्रशांत पाटील , प्रशांत पाटील, सुनील भांगरे, चंद्रकांत खैरनार , संजय तोगरे , सौ सोनाली मॅडम ,सौ सारिका निपुंगे, दीप्ती जोशी, सौ लीना ठाकूर, हिरामण अहिरे ,श्री रमेश सर ,शशेखर पाटील, सौ प्रतिभा जाधव , सौ सरिता तिवारी ,सौ कोमल गुंजाळ, सौ वनिता घाडगे, सौ साळुंखे आर,जे, श्री महाजन एस एच ,सौ अपर्णा कुलकर्णी ,सौ मेधा भिसे शितल पाथरे, स्वरा सप्रे, सौ गायकर मॅडम, श्री हरित मेहता , सौ नूतन कुऱ्हाडे , सौ तेजल राणा , सौ नमिता शेट्टी ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम पाहुण्यांना ओमकार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर बँडपथकाने सलामी देऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रवींद्र चव्हाण , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व बेडेन पावेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष,सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार , मा .श्री रविंद्र चव्हाण , व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच इतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह , शाल ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आदरणीय म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करताना सांगितले की स्काऊट गाईड चे विद्यार्थी शिस्तप्रिय आणि आज्ञाधारक असतात. तसेच वेणूगोपाल के यांनी सर्व स्काऊट गाईड यांना शुभेच्छा दिल्या . राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये चारित्र्य निर्मिती ,आरोग्य संवर्धन, कौशल्य विकास व्यक्तिमत्व विकास, देशाबद्दल अभिमान शिस्तीचे महत्व, मा कै. बाजवेयी सरांचा कोणत्याही विषयावर त्यांचा सखोल अभ्यास होता त्यामुळे त्यांचा सगळ्यांना खूप आदर व धाक होता हे आपल्या मनोगतातून सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगता नंतर ठाणे जिल्ह्यातील खालील गुणवंत स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन यांचा सन्मान करण्यात आला.स्वप्नपूर्ती स्मरणिका प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे यांच्या कडून सर्व सन्मानचिन्ह उपलब्ध करून देण्यात आले.
,श्री अशोक जगताप मॉडेल इंग्लिश स्कूल,
श्री केशव चौधरी ए के जोशी विद्यालय ,
सौ पुष्पा जगताप डी ए व्हीं पब्लिक स्कूल
सौ कल्पना बोर्वनकर ,डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर,
सौ संध्या निकम नवी मुंबई महानगरपालिका ,
सौ कल्पना गोसावी नवी मुंबई महानगरपालिका,
सौ प्रतिभा जाधव ओमकार इंग्लिश स्कूल,
विजेता रहाटे होली क्रॉस इंग्लिश स्कूल ,
उत्तम धात्रक छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल बदलापूर ,
राजू घुले होली एंजल स्कूल डोंबिवली ,
हरित मेहता सेंट जोसेफ हायस्कूल, अनुराधा द्विवेदी आर टी पी हिंदी स्कूल , शर्मिला हंबीरे अभिनव विद्या मंदिर भाईंदर,
श्री बैसाणे सर आत्मा मलिक स्कूल शहापूर इत्यादी स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट स्काऊट गाईड शाळा
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली,
ए के जोशी हायस्कूल ठाणे
डी ये व्हि पब्लिक स्कूल नवी मुंबई ,
डॉक्टर बेडेकर विद्यालय ठाणे ,
होली एंजल्स स्कूल डोंबिवली, ओमकार इंग्लिश स्कूल डोंबिवली ,
स है जोंधळे विद्यामंदिर गुजराती माध्यमिक विभाग डोंबिवली ,
या शाळेचा उत्कृष्ट स्काऊट गाईड शाळा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये एकूण 12 शाळांनी सहभाग घेतला
सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवत मंजुनाथ विद्यालय अग्रस्थानी राहिले. आयटीपी हिंदी विद्यालय दावडी या शाळेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
रोटरी स्कूल फॉर डेफ,या मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
टिळक नगर विद्यामंदिर जनगणमन स्कूल सीबीएससी,
ग्रीन्स इंग्लिश स्कूल या शाळांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.
ओमकार इंग्लिश स्कूल, आदर्श इंग्लिश स्कूल, शिवाई बालक मंदिर, प्राथमिक
स. है. जोंधळे इंग्लिश स्कूल प्राथमिक, शिवाई बालक मंदिर माध्यमिक विभाग, एस के पाटील स्कूल.या शाळांना सहभागी म्हणून गौरविण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून रेखा पूणतांबेकर व बिना अय्यर यांनी काम बघितले. सावित्री बाई फुले नाट्यगृहाच्या समोर सुरेख रांगोळी स्काऊट मास्टर साबळे यांनी काढली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
एकनाथ चौधरी,
जगदीश उगले
केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जगताप यांनी केले. व संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर खरे यांनी केले.व कार्यक्रमांमध्ये स्काऊट गाईड क्ल्याप देऊन मनोरंजनाचे राणे सर यांनी केले.
कार्यक्रमासाठी एकूण 23 शाळेच्या* ८०५ स्काऊट आणि गाईड व 150 स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांनी कार्यक्रमासाठी सहभाग नोंदविला सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जगदीश उगले
डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे सचिव जगदिश उगले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी डॉ. मनिलाल शिंपी यांनी प्रत्येकी ५००रू.चे रोख पारितोषिक देऊन कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *