1 min read

प्रताप महाविद्यालयात आध्यात्मिकतेवर व्याख्यान

Loading

प्रताप महाविद्यालयात आध्यात्मिकतेवर व्याख्यान

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात अहमदाबाद येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सदस्या प्रा. डॉ. ममता वर्मा यांचे “आध्यात्मिक सशक्तिकरण से स्वर्णिम भारत का उदय” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी ते म्हणाले की, “आध्यात्म मानवी जीवनाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो. व्यक्तिगत विकासासह समूहाचा विविधांगी विकास त्यातून साधला जातो. सकारात्मकतेमुळे मानवी जीवन सुंदर होते. अर्थात समाज आपोआपच सुदृढ होतो.” असे प्रतिपादन केले. यावेळी संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. डॉ. कल्पना पाटील, डॉ. जयंत पटवर्धन, प्रा.पराग पाटील, प्रा.डॉ. विजय मांटे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे, विविध विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग अधिक संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठ अमळनेरच्या विद्या दीदी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांनी केले. तर आभार प्रा. अवित पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *