साप्ताहिक राज्यमंथनच्या ‘ गुरुवंदना ‘ वर्धापन दिन विशेषांकाचे मा.नामदार गुलाबराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
![]()

साप्ताहिक राज्यमंथनच्या ‘ गुरुवंदना ‘ वर्धापन दिन विशेषांकाचे मा.नामदार गुलाबराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
राज्यमंथन साप्ताहिकाच्या ‘ गुरुवंदना ‘ वर्धापनदिन विशेषांकाचे महात्मा जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दिडशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने तसेच वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, दलुभाऊ जैन (अध्यक्ष, सकल जैन समाज ),जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे अशोक भाऊ जैन,भाजपा महानगर अध्यक्षा तथा नगरसेविका उज्ज्वला ताई बेंडाळे मान्यवरांच्या हस्ते प्रताप नगर मधील गौराई बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनांतर्गत मा . अशोक भाऊ जैन यांच्या उदार परवानगीने प्रकाशन करण्यात आले.
गुरुवंदना विशेषांकाचे वैशिष्ट्ये
मान्यवरांचे शुभेच्छा संदेश : – मा.ना. दिपकजी केसरकर ( मंत्री,शालेय शिक्षण – मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य ) व आमदार सुरेश दामू भोळे ( राजूमामा )
मान्यवरांच्या नामनिर्देशनासह लेखाचे विषय – शिक्षणतज्ज्ञ संदिप वाकचौरे ( संगमनेर ) व चंद्रकांत भंडारी, प्रा.व. होले ( सावदा ) – ‘ गुरु ‘ कोण व कसा असावा ?, ह.भ.प. मनोहर खोंडे – गुरुवंदना, पत्रकार रविंद्र मोराणकार – ‘ गुरु नव्हे मित्र ‘ निवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन – ‘ गुरु शिष्य नात्यात समर्पण ‘ तसेच कार्यकारी संपादक विजय लुल्हे यांचा ‘ महात्मा जोतिराव फुले यांची शैक्षाणिक क्रांती ‘ विशेष लेख, जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त श्रीमती उषा सोनार – ‘ माझे गुरु ‘ कल्पतरू ‘ हा लेख, डायट अधिव्याख्याते डॉ.रमेश चौधरी ( नंदुरबार ) – ‘ शिक्षक : काल, आज आणि उद्या ‘ व आणि प्रा.विमल वाणी, सारिका ताई पाटील यांचे वाचनीय लेख यांसह नामवंत कवयित्री सौ.मायाताई धुप्पड,तावडी बोलीचे प्रवर्तक कवी डॉॅ.अशोक कौतिक कोळी व प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ साहित्यिक कवी हेरंब कुलकर्णी,चित्रकार प्रकाश लिंगायत यांच्या दर्जेदार कविता तसेच बाल साहित्यिक कु.मानसी लिंगायत, कु.संस्कृती पवनीकर ,कु.जान्हवी खैरनार यांचे गद्य व पद्य
आणि दखलपात्र विविध विषयानुषंगे वाचनीय लेख यांनी संग्राह्य झालेला गुरुवंदना विशेषांक दर्जेदार आहे.उत्कृष्ट छपाई , दर्जेदार कागद व वाचनीय फॉन्ट त्यामुळे अंक लक्षवेधी झाला आहे.परिणामी सुजाण वाचक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर निश्चित विशेषांकाचे स्वागत करतील .
प्रकाशनाप्रसंगी राज्य मंथन साप्ताहिकाचे प्रमुख संपादक प्रकाश लिंगायत, विशेष मानद कार्यकारी संपादक विजय लुल्हे, जाहिरात व्यवस्थापक तुषार सोनार व अभय खंडारे ,मांडणी व सजावट तंत्रज्ञ विशाल कासार तसेच विशेषांकासाठी विशेष सहकार्य देणारे विनोद कुमावत (जिल्हाध्यक्ष कुमावत समाज ) पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

