अमळनेरला मराठी साहित्य संमेलन हे यशस्वी नाही ,ऐतिहासिक झाले पाहिजे
![]()
संमेलन हे यशस्वी नाही ,ऐतिहासिक झाले पाहिजे
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ रवींद्र शोभणे यांचा अमळनेर येथे सत्कार व मुलाखत या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात त्यांची म.सा.प चे कार्यवाह वि.दा पिंगळे( पुणे) यांनी घेतलेल्या मुलाखतीत प्रतिपादन..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मराठी वाड:मय मंडळ अमळनेर शारदीय व्याख्यानमालेत 15 ऑक्टोबर रविवारी प्रा डॉ रवींद्र शोभणे नागपूर नियोजित अध्यक्ष 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर यांनी सत्कार व मुलाखत या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात त्यांची वि.दा पिंगळे( पुणे) यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते म्हणाले सध्या महाराष्ट्रात माध्यमिक शाळेत शिक्षक भरती बंद मुळे शाळांची दयनीय परिस्थिती झाली आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी शासनाला अध्यक्षीय भाषणातून हा मुद्दा मांडणार आहे असे प्रा.डॉ रवींद्र शोभणे यांनी सांगितले..
मराठी वाड्.मय मंडळ अमळनेर
प्रा. आप्पासाहेब र.का केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमाला चे उद्घाटन दादासो अनिल पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री नंदुरबार) यांनी केले तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ रवींद्र शोभणे नागपूर यांचा सत्कार खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला ..कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.आ.स्मिताताई वाघ,अशोक जैन ,जैन उद्योग समूह जळगाव, प्राचार्य तानसेन जगताप जिल्हा प्रतिनिधी म.सा.प पुणे,,डॉ अनिल शिंदे कार्याध्यक्ष खा.शी मंडळ अमळनेर, राजेश जी पांडे सल्लागार समिती सदस्य सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे ,भरत अमळकर अध्यक्ष केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव, आहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले,सेवानिवृत्त पर्यवेक्षक सदाशिवराव बोरसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते..
प्रा डॉ शोभणे यांची मुलाखत पुणे येथील वि.दा.पिंगळे यांनी घेतली. कर्तुत्वातून सर शोभणे झाले असे सांगितले.
चाळीस ते पंचेचाळीस वर्ष साहित्य लेखन केले,अमळनेरला साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष होणे माझ्यासाठी संचेती मानतो..
२०१८ निवडणूक हरलो..पण खान्देशात संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लिहिले असतील.. मी अमळनेरकरांचे मनापासून आभार मानतो..
मोठ्या पणात लहाणपणाचे संस्कार असतात.. माझ्या घरचे वातावरण वारकरी सप्रदायाचे होते.लहाणपणापासूनच वातावरण घराचे धार्मिक होते.
महाभारत, रामायण ऐकण्याचे संस्कार झाले.. पुस्तकाचे वाचनाची सवय लागली,
नववीत असतांना शाळेत नाटक पाहिले,मलाही नाटकात घेण्यासाठी मी प्रयत्न केले.पण गुरूजींनी अगोदर नकार दिला.. वयाच्या बाराव्या वर्षी आम्ही स्वतः नाटक लिहले..वेगळं व्हायच मला..! हे नाटक लिहले..शाळेतील नाटकात देव माणूस यात भूमिका मिळाली..ते म्हणजे नंदीनी स्त्रीपात्र मिळाले,उखाणा केल्याने टाळयाचा कडकडाट झाला.
प्रवाह कादंबरीचा विषय काय होता..
ती कादंबरी कच्ची होती,मानवी वय कळण्याचे वय नव्हते, त्या कादंबरी चा मी पुनर्लेखन केली,तीच कादंबरी मी आता प्रकाशन केली.अकरा बारा कादंबरी लिहल्या
प्रश्न -कोंडी कादंबरी का गाजली..
-सत्य घटनेवर आधारित कादंबरी होती,त्या काळात माझे वाचन समृद्ध झाले होते.. आजही माझे कपडे स्वतः मी शिवतो,मी एक बेस्ट टेलर आहे याचा मला अभिमान आहे.
आदिवासी भागातील गावगुंड महीलांची शिदोरी ओढून नेण्याचा दोन गुंड प्रयत्न करतात. मी कादंबरी म्हणून लिहली..ती कादंबरी म्हणून यशस्वी प्रवास सुरु झाला..
प्रश्न-साहित्य संमेलनामुळे समाजमाध्यमात वाद का निर्माण होतात..
अध्यक्षाचे कर्तव्य काय असते?
-अध्यक्ष चालता बोलता राहणारे असावे,मी लोकामध्ये वावरणारा आहे, चार भिंतीच्या आड लिहीत नाही.९७ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर मला खुपच फोन आले.
लेखक हा चालताबोलता असावा तसा मी आहे, शासन हे आपले आहे, जर शासनाचे चुकत असेल सांगितले पाहिजे. शासनाकडून मराठी शाळांवर अन्याय होत आहे मी सांगितले.पालक व शासनाने मराठी शाळावर सकारात्मक दुष्टीने केले पाहिजे. अशी माझी भूमिका आहे..साहित्य संमेलनात अध्यक्ष झाल्यानंतर माझे पन्नास कार्यक्रम झाले आहेत.
प्रश्न-संमेलनात अध्यक्ष भाषण हा कुतूहल चा विषय असतो..
मराठी माध्यमाच्या शाळांचा विषय मी माझ्या भाषणाचा महत्त्वाचा विषय आहे, मराठी भाषा टिकवण्यासाठी शासनाने करण्यासाठी मी सांगणार आहे. ग्रामीण भागातील मुले शिकले पाहिजे यासाठी शासन २०१२ पासून शिक्षकांची नेमणुका करत नाही..हा विषय आहे. काही विषय ऐनवेळी बोलणार आहे.
व अभिजात भाषेचा निर्णय झाला तर इतिहास नोंद होणार आहे..
प्रश्न-स़ंत नामदेव यांच्या कार्याचे खरे मूल्यमापन का झाले नाही?
आपली मानसिकता कलुषित झाली आहे, महापुरुष, संत जातीपातीत वाटले,हि मानसिकता आड आली आहे. संत नामदेव यावर लिखाण करणारा तत्वचिंतक झाला नाही. म्हणून मूल्यमापन झाले नाही. वारकरी संप्रदायाचा पाया रचला, आत्मचरित्राची जाणीव करून दिली.. मराठी भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला.. संत नामदेवाच्या प्रेरणेने सर्व संत पुढे आले आहे… त्यांच्या कार्याला पुढे आणणे गरजेचे आहे असे सांगितले..
प्रस्ताविक करतांना मराठी वाड:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी म्हणाले की 1952 नंतर साहित्य संमेलन अमळनेरला मान मिळाला आहे. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे,महाराष्ट्र राज्य बाहेरील साहित्यिक संमेलनात येणार आहे, त्यासाठी अमळनेरकरांनी संमेलनाचा हिस्सा बनावा असे सांगितले…
नामदार मंत्री अनिल पाटील यांनी साहित्य संमेलनासाठी सर्वपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तर उद्योगपती अशोक जैन, यांनी खानदेशातील सानेगुरुजी यांच्या कर्मभूमीत संमेलन होणार याचा खूप आनंद आहे असे सांगितले..
कार्यक्रमाचे आयोजक वाड्.मय मंडळाचे अध्यक्ष डाँ अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाने, रमेश पवार, कार्यवाहक सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे व कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा डाँ पी.बी भराटे,
संदीप घोरपडे, प्रा डॉ सुरेश माहेश्वरी,
सौ वसुंधरा लांडगे, प्रा श्याम पवार ,श्रीमती स्नेहा एकतारे, बन्सीलाल भागवत, भैय्यासाहेब मगर, प्रा शीला पाटील, बजरंग अग्रवाल, अजय केले यांनी प्रयत्न केले.. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले तर आभार स्नेहल एकतारे मँडम यांनी मानले…






चौकट
संमेलन हे यशस्वी नाही ऐतिहासिक झाले पाहिजे असे सांगितले असतांना प्रा.डॉ शोभणे म्हणाले कि
मी पुन्हा येईन??..हे नागपूर चे वाक्य फेमस आहे असे मुलाखतकार वि.दा.पिंगळे यांनी विचारेल्या प्रश्न सांगतात श्रोते लोटपोट होऊन हसले..
नंतर प्रा.डॉ शोभणे म्हणाले की राजकीय अर्थ काढू नका…
चौकट
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या सन्मान पत्राचे लिखाण साहित्यिक रमेश पवार यांनी केले होते व त्याचे वाचन प्राध्यापक श्याम पवार यांनी केले. वेगवेगळ्या संस्थांच्या वतीने त्यांचा सहपत्निक जंगी सत्कार करण्यात आला.. सत्काराला उत्तर देतांना प्राध्यापक शोभणे म्हणाले की मी आपल्या सत्काराने मी भारावलेलो आहे.. साने गुरुजींच्या कर्मभूमीत माझ्या सत्कार झाला व मला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला याच्यासारखे भाग्य कोणतेच नाही असेही त्यांनी सांगितले..सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, साहित्य परीषदेचे पदाधिकारी, मंगळग्रह संस्था, पत्रकार संघटना,शिक्षक संघटना, महिला मंच अशा विविध संघटनेच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ शोभणे यांचा सहपत्निक सत्कार केला..





