जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या अध्यक्षा ऍड.छाया सपके यांचा सत्कार
![]()


जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या अध्यक्षा ऍड.छाया सपके यांचा सत्कार :
साई सेवा परिवाराच्या जेष्ठ सदस्या ऍड. छाया सपके यांची जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जळगाव जिल्हा साई सेवा परिवार, जळगाव जिल्हा महिला साई सेवा परिवार व जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल एस तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा साई सेवा परिवाराचे हरिश चावला, जगन्नाथ तळेले, रवींद्र हसवाल, साई सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा जाधव, साई सेवा महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा प्रतिभा चौधरी, जिल्हा धोबी समाज शिक्षक मंडळाचे सचिव अरुण सपकाळे यांची उपस्थिती होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत राज्यातून विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल व शारदीय पर्वाच्या प्रारंभी ऍड छाया सपके यांचा सत्कार म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे असे अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक एल एस तायडे यांनी विशद केले. जिल्हा साई सेवा परिवाराचे सचिव राजेश जाधव यांनी ऍड छाया सपके यांची शैक्षणिक व विधी क्षेत्रातील व्यावसायिक कारकिर्दचा या पदापर्यंतचा प्रवास विशद केला सत्काराला उत्तर देतांना ऍड छाया सपके यांनी या पदापर्यत पोहचण्याचे स्वप्न माझे वडील व सासू यांचे होते व ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मला माझे पतीची मोलाची साथ मिळाल्याने मी कठोर परिश्रम घेतले व यशस्वी झाले हा सन्मान माझा नसून संपूर्ण नारीशक्तीचा सन्मान आहे व या पदाला मी निश्चितच न्याय देईल हे सांगितले.याप्रसंगी दामूआण्णा चौधरी, सुभाष पाटील, गजानन चौधरी, सागर मणियार सर साई सेवा महिला मंडळाच्या हेमलता हसवाल, सुनंदा पाटील, लता पवार, सविता महाजन, किरण भंडारी, निर्मला जाधव, देवका चौधरी तर जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेतर मंडळाचे संजय खैरनार, उमेश्वर सूर्यवंशी, चंद्रकांत वाघ, प्रशांत मांडोळे, मनोज वाघ, विजय शेवाळे यांचेसह प्रा हरिश शेळके, विजय विसपुते, जितेंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन संजय खैरनार यांनी केले.

