भाऊसाहेब राऊत विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
![]()

भाऊसाहेब राऊत विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक एल.एस.तायडे, पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग, अरुणकुमार बाविस्कर, विनोद कोळी, प्रकाश मेंढे, विद्यालयाचे ग्रंथपाल आर.एस.ठाकरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख योगराज सोनवणे यांनी आजच्या दिनाचे महत्व व वाचन प्रेरणा दिन आजच का साजरा केला जातो तसेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विज्ञान क्षेत्रातील कार्य विशद केले मुख्याध्यापक एल.एस.तायडे यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या बालपण, शैक्षणिक कारकीर्द ते क्षेपणास्त्र निर्मिती व राष्ट्रपती पदाचा प्रवास व त्यानंतरचे कार्य सविस्तर विशद करून विद्यार्थ्यांना त्यांचे जीवनावर काही प्रश्न दिलेत व जे विद्यार्थी या प्रश्नांची अचूक उत्तरे देतील त्यांना पारितोषिक म्हणून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावरील पुस्तके भेट देण्यात येतील असे जाहीर केले. विदयार्थ्यांनी एक तास विविध पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर व विदयार्थी यांची उपस्थिती होती.

