1 min read

श्री. शिवाजी हाय व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहाने साजरा….

Loading

श्री. शिवाजी हाय व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहाने साजरा….

विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी उपक्रमम…

आमच्या शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व विशद करताना डॉ. कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाची माहिती शाळेतील शिक्षक श्री. संदीप गोसावी यांनी विद्यार्थ्यांना दिली,यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे व पुस्तकांचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. एम. ए. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘वाचाल तर वाचाल’, ‘शिकाल तर टिकाल’, ‘ज्ञानाची पाहिजे खात्री, तर पुस्तकांशी करा मैत्री’ या संकल्पना यावेळी उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आल्या. शिक्षक व विद्यार्थी यांनी पुस्तकांचे वाचन केले.

पुस्तकांचा हा खजिना पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र होते. यामुळेच शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी आता वाचनालयाचा आनंद घेतील, अशी आशा शिक्षकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे पर्यवेक्षक श्री. एस. एम. पाटील सर यांनी उपस्थिती सर्वांना ‘वाचन प्रेरणा दिना’च्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.यावेळी कार्यक्रमास सर्व शिक्षक, प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *