1 min read

बालाजी विद्यालय येथे वाचन-प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा…

Loading

बालाजी विद्यालय येथे वाचन-प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा…

गांधली पिळोदे येथील बालाजी विद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त ‘ वाचन-प्रेरणा दिन ‘ उत्साहात साजरा केला गेला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.के काटे यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री आशिष शिंदे यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय,खडतर शिक्षणाचा प्रवास, वैज्ञानिक होताना आलेले अनुभव,डॉ.विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनात मिसाईल प्रक्षेपण चाचणी यशस्वी करण्यासाठी अतोनात केलेले प्रयन्त,भारताचे यशस्वी मिसाईल मॅन,राष्ट्रपती,भारतरत्न या संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी दामिनी बडगुजर हिने महात्मा फुले लिखित ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकाचे वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत “जागतिक हातधुवा दिन” ही साजरा केला गेला.श्री.एन वाय पाटील यांनी हात धुण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.सर्व विद्यार्थ्यांना दररोज वेळोवेळी हात धुण्यासाठी प्रेरित केले.यावेळी विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक सी वाय पाटील,एस के वंजारी,ए.डी.शिंदे,जे एच लोहार,एन एस निळे,एस डी सूर्यवंशी,श्रीमती एस ई देसले, व्ही एच चित्ते,पी एस अहिरराव,एस जे पाटील,श्री.एस एस पाटील,बी एस भिल, आर.पी.पवार, आदीची कार्यक्रमास उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे एच लोहार यांनी तर आभार एन एस निळे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *