1 min read

कला शिक्षक यश महाजन यांनी नवरात्री सणानिमित्त साकारली कष्टकरी दुर्गाचे रूप

Loading

कला शिक्षक यश महाजन यांनी नवरात्री सणानिमित्त साकारली कष्टकरी दुर्गाचे रूप

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कळमसरे ता.अमळनेर येथील कलाभूषण
कला शिक्षक व कल्याण येथील वाणी विद्याशाला हायस्कूलचे शिक्षक यश महाजन यांनी कलेच्या माध्यमातून अनेक जिवंत देखावे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तीची हुबेहूब प्रतिमा साकारलेल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावर्षी नवरात्री उत्सव 2023 निमित्त काही भाविक आपली श्रद्धा जोपासण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात परंतु मी माझ्या कला माध्यमातून नवरात्रीचे नऊ दिवस नऊ ज्या सर्वसाधारण महिला यांची नारीशक्ती रुपी (दुर्गा) रुपी खडू माध्यमातून चित्रकृती रेखाटून सर्व महिलां भगिनींचा सन्मान करण्याचा व मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करणार आहे यातगृहिणी १)शिक्षिका २)पोलीस ३),डॉक्टर ४)सफाई कर्मचारी ५)भाजी विक्रेती, ६)मासे विक्रेती ७) गृहिणी ८) वाहन चालीका ९) शेतकरी महिला इत्यादी रुपात खडु चित्र रेखाटनार आहे. यश महाजन कला शिक्षक श्री वाणी विद्याशाला स्कूल कल्याण पश्चिम येथील ते शिक्षक आहेत त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कळमसरे येथील समाजबांधव व मित्र परीवार यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *