1 min read

कल्याण डोंबिवली येथे जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा संपन्न.

Loading

कल्याण डोंबिवली येथे जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा संपन्न.

ठाणे : कल्याण( मनिलाल शिंपी )कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित १४ वर्षे खालील मुलींची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा दिनांक 13 ऑक्टोबर रोजी बिर्ला स्कूल च्या क्रीडांगणात क्रीडा संयोजक सनियंत्रक कृष्णा माळी यांच्या नेतृत्वाखाली, उपायुक्त स्नेहा करपे यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, यांचा मार्गदर्शनाखाली खेळप्रमुख दिनेश पवार ,यांचा सहकार्याने रेल्वे स्कूल चे आर.बी.नितनवरे, मॉडेल इंग्लिश स्कूल चे सुनिल पाटील, संघ व्यवस्थापक राम नायर, आर एस पी चे क्रीडा संघटक मनिलाल शिंपी यांचा उपस्थितीत प्रमुखपंच म्हणून थॉमस कॅस्टीलिनो यांचा नियंत्रणाखाली केतन अमीन, साईराज हे परिश्रम घेत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हास्तरीय स्पर्धा नियोजन आयोजन व व्यवस्थापन या कल्याण डोंबिवली मधील धडाडीचे कार्य तत्पर आणि खेळाडूंच्या हितासाठी स्वतःच्या व्यस्त वेळेतून या जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा सनियंत्रण संघटक आदरणीय कृष्णा माळी व कृष्णा बनगर यांच्या सिंहाच्या वाटा आहे. 14 वर्षाखालील जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सेंट तेरेसा कॉन्व्हेंट स्कूल डोंबिवली, सेठ हिराचंद मुथा स्कूल, गुरुनानक इंग्लिश स्कूल कल्याण, सेंट जॉन हायस्कूल डोंबिवली, ईवा वर्ल्ड स्कूल डोंबिवली, बीके बिर्ला पब्लिक स्कूल कल्याण, सेंट झेवियर स्कूल कल्याण, गार्डियन इंग्लिश स्कूल डोंबिवली, रेल्वे स्कूल कल्याण, रॉयल इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली, बालक मंदिर इंग्लिश स्कूल कल्याण, मेरिडियन स्कूल टिटवाळा, सेंट लॉरेन्स इंटर स्कूल कल्याण, सेंट मेरी हायस्कूल कल्याण अशा 16 संघांनी सहभाग नोंदवला आहे.या सर्व फुटबॉल स्पर्धांचे नियोजन बिर्ला स्कूल चे क्रीडा पर्यवेक्षक लक्ष्मण बांडे,यांच्यासह बिर्ला स्कूल चा सर्व क्रीडा संघटक यांनी विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *