महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे शैक्षणिक प्रश्न तात्काळ सुटावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याबरोबर बैठक
![]()

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे शैक्षणिक प्रश्न तात्काळ सुटावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याबरोबर बैठक
मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी):आज दिनांक: 12 ऑक्टोबर 2023 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खालील विषयांवर शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे यांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली, त्या ठिकाणी माननीय राजेश शिंदे आणि दिपक पाटील साहेब उपस्थित
जावक रजिस्टर उपलब्ध आहे मात्र् वैयक्तिक मान्यता जावक नंबर जुळत नाहीत.राज्यातील शिक्षणाधिकारी यांना याबाबत सखोल चौकशीचे आदेश देऊन पात्र शिक्षक- शिक्षकेतरांना दिलासा दिला जाईल.40% व 60 टक्के अनुदानावर पोहोचलेल्या शाळांचे काहीही पाहू नये म्हणून आयुक्तांनी 20 जुलै च्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पॉईंट्स मध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे,.
आदेश लवकर निघावा म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसर पाठपुरावा करणार व लवकरात लवकर आदेश आल्यावर कोणतेही मुद्दे न पाहता पुढील टप्पा वाढीचा आदेश मिळेल.
30 नोव्हेंबर 2022 रोजी व्हॅलिड विद्यार्थी संख्येवर मागील वर्षाची संच मान्यता तात्पुरती करण्यात आली होती, याची फायनल संच अन्यथा पुढील आठवड्यामध्ये सर्व शाळांना मिळेल, कमी झालेली पदे व व्हॅलिड विद्यार्थी त्याच्यामध्ये येतील त्यामुळे अनुदाना पासून कुणी वंचित राहणार नाही , शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत.
अंशतः अनुदानावर संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबवणार नाहीत, या जिल्ह्याने थांबवले होते त्यांना अधिकाऱ्यांकडून समज देण्यात आली आहे. शेवटच्या वर्गाची पटसंख्या मागील वर्षी नव्हती, मात्र यावर्षी शेवटच्या वर्गाची पटसंख्या पुरेशी आहे, त्यांना या वर्षाची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन अनुदान वितरित केले जाणार आहे,
संच मान्यता दुरुस्ती प्रगतीपथावर सुरू आहे, 15 दिवसात सर्व संच मान्यता दुरुस्त करून मिळतील. कनिष्ठ महाविद्यालय त्रुटी पूर्तता केलेल्या वाढीव पदांची माहिती तयार आहे , फक्त पुणे विभागाची बाकी आहे पुढील आठवड्यात सर्व माहिती शासनाकडे जाईल.सातवा वेतन आयोगाचा दुसरा तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी मिळावा अशी मागणी केली, संचालक कार्यालयातून निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे.थकीत बिले ,मेडिकल बिले त्वरित मंजूर करावीत याविषयी चर्चा केली बिले मंजूर होतील.
संच मान्यता दुरुस्ती असलेल्या शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त करता येणार नाहीत. अघोषित शाळांची यादी शासनाकडे पाठवणे बाबत चर्चा करण्यात आली.
विद्यार्थी संख्येमुळे पद कमी होत असल्यास, मान्यता प्राप्त मुख्याध्यापक अतिरिक्त करू नये.
दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व शाळांचे ऑक्टोबर 2023 पेड इन नोव्हेंबर वेतन व्हावे.
तसेच सहाय्यक संचालक श्री हरून आत्तार साहेब व प्राथमिकचे संचालक माननीय श्री शरद गोसावी साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या स्तरावरचे प्रश्न सुद्धा चर्चाकडून सोडवले.
पुणे , सोलापूर विभागातील प्रलंबित शालार्थ आयडी तात्काळ मिळावे म्हणून शिक्षण उपसंचालक श्री राजेंद्र अहिरे साहेब यांची सुद्धा भेट घेतली, आज उशिरापर्यंत थांबून जास्तीत जास्त शालार्थ आयडी देण्याचा प्रयत्न करतो असे उपसंचालक राजेंद्र अहिरे साहेब यांनी सांगितले.
अशी माहिती विठ्ठल गोरे जिल्हा अध्यक्ष पालघर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक संघटना यांच्याकडून प्राप्त झाली.

