प्रताप’ मध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
![]()

‘प्रताप’ मध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे
सामाजिकशास्त्रे विभाग अंतर्गत १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता
एक दिवसीय
राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास, अर्थशास्र, राज्यशास्र, संरक्षणशास्र, तत्वज्ञान, लोकप्रशासन, ग्रंथालयशास्त्र, समाजकार्य, शिक्षणशास्र आदी अनेक विषयांचे
एकूण १०२ शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत परिषदेचे बीजभाषक डॉ. प्रशांत अमृतकर (औरंगाबाद), प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य मनोज साळी (नाशिक), संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. हरिष नवले (पुणे), डॉ. बिना सेंगर (औरंगाबाद), डॉ. बाळासाहेब पाटील (पनवेल) आदी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन सत्र श्री राणे सभागृह आणि समारोप सत्र पूज्य साने गुरुजी सभागृहात संपन्न होणार आहे. उदघाटन प्रसंगी विविध विषयांचे संशोधनपर निबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नलचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शोधनिबंधाचे सादरीकरण दुसऱ्या सत्रात दोन्ही सभागृहात सुरु असेल. अधिकाधिक सहभागाचे आवाहन खा.शि.मंडळाचे सर्व पदाधिकारी, मा. प्राचार्य डॉ. ए. बी. जैन व संयोजकांनी केले आहे.

