प्रताप महाविद्यालयात युवारंग उपविजेता संघाचा सन्मान
![]()

प्रताप महाविद्यालयात युवारंग उपविजेता संघाचा सन्मान
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात युवारंग- युवक महोत्सव -२०२३-२४ मध्ये उपविजेता ठरलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या कलावंत संघाचा खान्देश शिक्षण मंडळ व प्रताप महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, सीए. नीरज अग्रवाल, बजरंगजी अग्रवाल, चिटणीस तथा प्राचार्य डॉ ए बी जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.एच.निकुंभ, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा.डॉ. जयंत पटवर्धन,प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, माजी प्राचार्य डॉ. पी.आर.शिरोडे, डॉ.अविनाश जोशी, आयक्युएसी समन्वयक डॉ.मुकेश भोळे,वसतिगृह प्रमुख डॉ. अमित पाटील, प्रा. आर.एम.पारधी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धक संघाचे ढोलताशांच्या जल्लोषात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले व विजेत्या स्पर्धकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या युवारंग महोत्सवात एकूण ५ मुख्य कलाप्रकारांमधील २६ स्पर्धांपैकी महाविद्यालयाने २३ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला होता.
यापैकी १६ उपकला प्रकारांच्या स्पर्धांमध्ये प्रतापच्या संघाला यश प्राप्त झाले. ५ सुवर्णपदके ५ रजतपदके, ६ कांस्यपदके प्राप्त झाले.
मुख्य कला प्रकारांपैकी महाविद्यालयाला नृत्य या कलाप्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाली
एकूण १६ पदके मिळाली. या बळावर प्रताप महाविद्यालयाला सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त झाले.
युवारंग समन्वयक: प्रा. नितीन पाटील, सह-समन्वयक : डॉ. योगेश तोरवणे,
संघव्यवस्थापक : प्रा. डॉ. तुषार रजाळे, महिला संघव्यवस्थापक: डॉ.नलिनी पाटील, यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. संदीप नेरकर, ग्रंथपाल डॉ. डी. आर.पाटील, प्रा.डॉ. धनंजय चौधरी,प्रा हेमंत पवार, प्रा. योगेश तोडा, प्रा. अवित पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. किरण भागवत, प्रा. किरण सूर्यवंशी , प्रा. संतोष दिपके, प्रा. एस डी बागूल, प्रा महेंद्र महाजन, प्रा. आकाश पाटील कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे, कुलसचिव आबासाहेब मैराळे, भटू चौधरी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

