1 min read

जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)ची 14 ऑक्टोबरला सहविचार सभा

Loading

जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)ची 14 ऑक्टोबरला सहविचार सभा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी कौन्सिल सदस्य, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जळगाव शहर, महानगर अध्यक्ष सेक्रेटरी यांना कळविण्यात येते की जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा कार्यकारिणीची सभा शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी सिव्हिल हॉस्पिटल मागे जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन एका पत्रकाद्वारे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन चे सेक्रेटरी शालीग्राम भिरूड यांनी कळविले आहे

सभेतील विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, कंत्राटीकरण व शाळा खाजगीकरण या विरुद्ध आयोजित आंदोलनाची माहिती देणे व आंदोलनाचे नियोजन करणे, तालुका संघ व जिल्हा संघ निवडणुकीबाबत चर्चा करणे, माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे असे माध्यमिक शिक्षक संघटनेचे(फेडरेशन)चे
सेक्रेटरी शालिग्राम भिरूड
यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *