सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीता पाटील यांनी घेतली डॉ अनिल शिंदे यांची सदिच्छा भेट.
![]()


सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीता पाटील यांनी घेतली डॉ अनिल शिंदे यांची सदिच्छा भेट.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. अनिल शिंदे यांची सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीता पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट.
यावेळी मेहमूद खान, चंदू शर्मा, दिलीप चौधरी, वसीम खान, मोतीलाल महाजन, निंबा चौधरी, शाहरुख, नाना सुतार, आदी उपस्थित होते.
या भेटीत सौ, संगीता पाटील यांनी अमळनेर विधानसभा क्षेत्राविषयी सखोल चर्चा डॉ. अनिल शिंदे यांच्याशी केली. अंमळनेर विधानसभा काँग्रेस पार्टीची पुढील वाटचाल काय असेल, तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर यावेळी जोर देण्यात आला. तरुणांनी काँग्रेस पार्टीत सामिल व्हावे, तसेच नवीन पिढीला संधी उपलब्ध करून देण्याविषयी चर्चा करण्यात आली. येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अश्या प्रकरच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
सौ. संगीता पाटील यांनी डॉ. अनिल शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली, त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साहाचे व जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी काँग्रेस पार्टीचा जयघोष करण्यात आला.

