1 min read

साने गुरुजी नुतन माध्यमिक विदयालयाचा उमेश अहिरराव ची विभाग स्तरावर निवड

Loading

साने गुरुजींच्या उमेशची विभाग स्तरावर निवड
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्य.विद्यालय अमळनेरच्या विद्यार्थी १७ वर्षा आतील जिल्हास्तरीय आंतरशालेय गोळाफेक स्पर्धेत प्रथम आला, तसेच सॉफ्टबॉल जिल्हा उपविजयी संघ म्हणून याच विद्यालयाचा संघ जाहीर करण्यात आला.
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर चा उमेश विकास अहिरराव हा १७ वर्षाआतील आंतरशालेय स्पर्धेत जिल्हात प्रथम आला त्यानंतर त्याचे शाळेत अभिनंदन करण्यात आले त्याने पहिल्या प्रयत्नात ८.८०मी, दुसऱ्या प्रयत्नात ९.००मी तर तिसऱ्या प्रयत्नात ९.२०मी लांब गोळा फेकला त्यामुळे त्याला जिल्ह्यात प्रथम विजेता घोषित करण्यात आले व त्याची विभाग स्तरावर निवड करण्यात आली,
त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आबासो हेमकांत पाटील सचिव दादासो संदीप घोरपडे व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक सुनील पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले त्याला क्रीडा शिक्षक संदीप घोरपडे, विलास चौधरी, जयेश मासरे व वर्ग शिक्षक डी.ए.धनगर यांचे मार्गदर्शन लाभले. विभागीय स्पर्धा १७ ऑक्टोंबर रोजी नाशिक येथे होणार आहे त्यासाठी सदर विद्यार्थी त्या स्पर्धांमध्ये खेळणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *