1 min read

प्रताप महाविद्यालयाचा बायोएरा ऑरगॅनिक्स प्रा. लि.नाशिक यांच्याशी सामंजस्य करार प्रस्थापित

Loading

प्रताप महाविद्यालयाचा बायोएरा ऑरगॅनिक्स प्रा. लि.नाशिक यांच्याशी सामंजस्य करार प्रस्थापित

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभाग व नाशिक येथील बायोएरा ऑर्गनिक्स प्रा. लि. यांच्यात MOU (सामंजस्य करार) नुकताच प्रस्थापित करण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरणानुसार एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात इंडस्ट्रीयल ड्रेनिंग अनिवार्य करण्यात आलेली असल्यामुळे या MOU मुळे BioEra organics येथे जैविक खत उत्पादन प्रक्रियेचे प्रशिक्षण सुक्षजीवशास्त्रच्या विद्यार्थ्यांना घेण्याची संधी मिळेल. या करारावर प्राचार्य डॉ. ए .बी. जैन, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. ए. जोशी तसेच BioEra चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. हेमंत पाटील यांच्या स्वाक्षरीने हा करार प्रस्थपित करण्यात आला. त्याप्रसंगी आयक्युएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य डॉ. विजय मांटे, इन्क्युबेशनचे समन्वयक डॉ. निलेश पवार हे उपस्थित होते.
या कराराबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व कार्यकारी मंडळ, चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *