1 min read

प्रताप महाविद्यालयातील व्याख्यान संपन्न

Loading

प्रताप महाविद्यालयातील व्याख्यान संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात सुक्ष्मजीवशास्त्र विभाग व इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी अतिथी व्याख्यानाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.
सुक्ष्मजीवशास्त्र विभागात incubation center च्या अंतर्गत BioEra organics, नाशिकचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. हेमंत पाटील यांनी Scope and opportunities in entrepreneurship या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करियरच्या वाटेने जाताना स्वतःचे स्टार्टअप सुरू करून व्यावसायिक क्षेत्रात असणाऱ्या विविध संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान व आपण बनविलेल्या उत्पादनाचे मार्केटिंग याबाबतही मार्गदर्शन केले. फक्त मुलेच नाही तर मुलीही आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विभागप्रमुख प्रा. शशिकांत जोशी यांनीही बदलत्या काळातील गरज ओळखून विद्यार्थ्यांनी व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले. Bioera organics ,नाशिक या agriculture industry सोबत विभागाने केलेल्या कराराविषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व कार्यकारी मंडळ, प्राचार्य डॉ. ए. बी.जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी केले तर आभार प्रा. मंजुषा मराठे यांनी मानले. यावेळी विभागातील प्रा. वैशाली महाजन, प्रा. नूतन बडगुजर, प्रा.नेहा पवार, प्रा. आदित्य संकलेचा, प्रा. प्रीती देशमुख, प्रा. प्राजक्ता चौधरी, प्रा. नेहा महाजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *