1 min read

मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस -प्रकाश पाटील

Loading

वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द.

जाहिरात…..

मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस

बापूसाहेब प्रकाश पाटील

कदम ऐसा चलो की निशान बन जाये!

काम ऐसा करो की,पहचान बन जाये!

यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है!

मगर जिंदगी जियो तो ऐसी!

की सबके लिए मिसाल बन जाये!

पी.बी.पाटील उर्फ बापूसाहेब प्रकाश पाटील यांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता आपल्या परिने मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव.कोणीही गरजू मनुष्य बापूकडे गेले म्हणजे सदर माणसाला खरंच मदत करणे गरजेचे आहे का बापू ओळखतात आणि त्यातून मार्ग शोधून त्याला मदत करतात.  आर्थिक असो सामाजिक शैक्षणिक असो त्या ठिकाणी बापू हजार… माणसे जोडणे हे बापूंना चांगले जमते .’मानसे तोडणे सोपे परंतु माणसे जोडणे कितीतरी अवघड’ बापूने आजपर्यंत माणसं वाचली व  मैत्रीसाठी वेचली त्यांची मैत्री देखील निस्पृह व निस्वार्थी आहे .निरपेक्ष मैत्री जपणारा व माणसातील माणूसपण जपणारा हा दिलदार माणूस.
पी.बी.पाटील यांचा जन्म अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण या ग्रामीण भागातील.. आई वडील हाडाचे शेतकरी, तिन भाऊ व दोन बहीणी असा परीवार होता.घरातील परिस्थिती जेमतेम.. पण शिक्षणाची जिद्द असल्याने मोठा भाऊ आदर्श शेतकरी, एक मुख्याध्यापक, लहान डाँक्टर ..प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात पारंगत आहेत. आई वडीलांच्या संस्काराची शिदोरी व मार्गदर्शन यामुळे आपल्या जन्मभूमी या सबगव्हाण गावी वडील पंधरा वर्षे सदस्य ,त्यानंतर बापूसाहेब व त्यांची पत्नी यांनी ग्रामपंचायत सदस्य राहून समाजसेवा करण्यासाठी त्यांना संधी मिळाली. समाजसेवेचे बाळकडू हे पी.बी.पाटील यांना आपल्या आई वडीलाकडून मिळाले.आज सरांचा संपूर्ण परीवार सुशिक्षित आहे. पी.बी.पाटील सरांना दोन मुले..एक मुलगा नेव्हीमध्ये .कमी वयातच देशसेवा करण्याचे बाळकडू वडिलांकडून त्याला मिळाले. मुलगी बी फार्मसी ला प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.. एका यशस्वी पुरूषामागे त्यांची धर्मपत्नी ही सावलीसारखी खंबरीपणे उभी आहे. सरांना प्रकाशमान करून त्यांची जनमानसात किर्ती वाढवली..म्हणून बापूच्या यशाच्या घोडदौडमध्ये आमच्या वहीणी यांचीही यशस्वी भूमिका आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही.

  मा.बापूसाहेब पी.बी.पाटील यांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत.त्यांना संस्थेचे अध्यक्ष कै.अनिलदादा अंबर पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असत.त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे तेवढेच सत्य.
पंधरा वर्षापासून मुख्याध्यापक पदाची नोकरी करत असतांना सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले. कायम विनाअनुदानित शाळेच्या प्रश्नासाठी शासन दरबारी लढा दिला.कायम विनाअनुदानित हे तत्व जाचक आहे. ते रद्द व्हावे यासाठी कोर्टात याचीका टाकली.अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला.आपल्या जन्मभूमी ठिकाणी वडीलांच्या नावाने वाचनालय व ग्रंथालय सुरू करून वाचन चळवळीला हातभार लावला. व ते त्याठिकाणी अध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करीत असतांना केवळ नोकरी एके नोकरी असा पांढरापेशीय नसलेला ,सामाजिक कार्याची आवड असलेला हा समाजप्रिय माणूस आपण समाजाचे देणे लागतो याचे भान ठेवून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारा हा माणूस जातीतील नव्हे तर परजातीतील लग्नकार्य,मरणधरण ,प्रसंगी संकटकाळी धावून जाणारा माझा मित्र समाजा इतका कुटुंबावर भरभरून प्रेम करतो.आज अनेकजण सरकारी नोकरी व समाजसेवा,संघटना यात एकाचवेळी काम करणे जमत नाही पण याला बापूसाहेब अपवाद आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही दुःख मी पाहीले नाही. ते कितीही कामात राहीले ते आपल्या मित्राशी दोनशब्द प्रेमाचे बोलतात हे त्यांचे विशेष आहे.धकाधकीच्या जीवनात काही माणसं घडयाळच्या काटयावर चालतात पण याला आमचे मित्र अपवाद आहेत. एखादे काम सांगितले त्यांनी कधीच नाही म्हटले नाही हे तेवढेच सत्य. त्यांच्या या चांगल्या कामामुळे  माणसं पदे मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्याकडे पदे हे चालून येतात. सर मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष,मुख्याध्यापक संघाचे कौन्सिल सदस्य, सबगव्हाण येथील छत्रपती प्रतीष्टानचे अध्यक्ष आहेत.त्यांनी नाशिक बोर्ड सदस्यपदी उत्कृष्ट काम केले आहे. निवड झाली तेव्हा मित्र परीवारकडून त्यांच्यावर अभिनंदन व सत्काराचा वर्षाव झाला.
शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची पावती म्हणून त्यांना अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोजबापू पाटील यांनी उमेदवारी दिली…
जळगाव जिल्हा शिक्षकांच्या ग.स सोसायटीमध्ये कोणते प्रकारचे राजकीय वलय नसतांना व नातेवाईक राजकारणात नसतांना निवडणूक स्वतः लढली.. शेवटच्या क्षणापर्यंत ग.स सोसायटीच्या निवडणुकीत स्वतः प्रचार प्रसार केला.. 5000 च्या आसपास मतं खेचून आणली.. ग.स.सोसायटीमध्ये एवढी मत मिळविणे साधी गोष्ट नाही…
थोड्या मतासाठी त्यांचा पराभव जरी झाला ते हरूनही विजयी झाले आहेत तेवढेच सत्य…
एका शायरने म्हटले आहे….
हमें तो अपनो लूटा गैरों में कहाँ दम था..

मेरी कश्ती भी वहाँ डूबी जहाँ पानी ही कम था…
मा प्रकाश पाटील सर नेहमीच सामाजिक शैक्षणिक उपक्रमात यांचा नियमित सहभाग असतो.. कधीही चेहऱ्यावर दुःख दिसले नाही.. नेहमीच आनंदी असणारे व दुसऱ्यांना आनंद देणारे तालुक्यातील आनंदी मुख्याध्यापक म्हणून आम्ही त्यांना पाहतो…
सर कोणते कार्य असो ते स्वतःला झोकून देतात.. यश अपयश याला महत्त्व न देता आपले काम सदैव सुरू ठेवतात.. हा त्यांच्या मधला सर्वात महत्त्वाचा गुण घेण्यासारखा आहे… कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांना आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे…

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी… घरट्यांचे काय आहे बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडेही झेप घेण्याची जिद्द असावी. …..

काही माणसांचे जीवन हे इतरांसाठीच परमेश्वराने राखून ठेवलेले असते. त्यांनी फक्त समाजाचे व परीसरातील तळागाळातील नागरिकांचे समस्या सोडण्यासाठी धडपडत असतात. आपण समाजासाठी आहोत, समाज आपल्यासाठी नाही ही धारणा ज्याच्याजवळ असते तोच मनुष्य ध्येयाची उंची गाठू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगरूळ येथील कै.दादासौ अंबर राजाराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे  मुख्याध्यापक  बापूसाहेब पी.बी.पाटील होय. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन ओळी तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !

ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

शब्द संकलन
ईश्वर आर महाजन
मुख्यसंपादक
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *