लोकनेते संजय खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त जैताणेत विविध उपक्रम!
मोफत नेत्र तपासणी, वृक्षारोपण, रविकिरण महाराजांच्या कीर्तनासह विविध विकासकामांचे उद्घाटन!
![]()
लोकनेते संजय खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त जैताणेत विविध उपक्रम!
मोफत नेत्र तपासणी, वृक्षारोपण, रविकिरण महाराजांच्या कीर्तनासह विविध विकासकामांचे उद्घाटन!
(मराठी लाईव्ह न्युज धुळे जिल्हा प्रतिनिधी प्रा.भगवान जगदाळे)
धुळे : जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, भाजपा ओबीसी मोर्चाचे धुळे जिल्हा सरचिटणीस, सावता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष संजय खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराने विविध उपक्रम राबविले.


त्यात शंकरा आय हॉस्पिटल, आनंद (गुजरात) व जैताणे ग्रामपालिकेचे गटनेते तथा उपसरपंच बाजीराव पगारे व सामाजिक कार्यकर्ते गणेश देवरे यांच्या पुढाकाराने सुमारे ५७ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यांना पुढील उपचारासाठी शंकरा आय हॉस्पिटल, आनंद (गुजरात) येथे नेण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थही उपस्थित होते.
जैताणे ग्रामपंचायतीसह वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने निजामपूर पोलीस वसाहतीच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या सोनाली पगारे, निजामपूरचे माजी सरपंच अजितचंद्र शाह, साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र शाह, उपसरपंच बाजीराव पगारे, प्रकाश पाटील, राकेश शेवाळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर संजयनगर परिसरातील भातुजी महाराज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकसह लाखो रुपयांच्या विविध विकासकामांचेही उद्घाटन झाले.
दरम्यान सोमवारी (ता.२) रात्री जैताणे ग्रामपंचायत चौकात दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील हभप. रविकिरण महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, जैताणे ग्रामपंचायतीचे गटनेते तथा उपसरपंच बाजीराव पगारे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ सोनवणे व गणेश देवरे यांच्यासह मित्रपरिवाराने कीर्तनाचे संयोजन केले.
ह्या कीर्तनास निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील शेकडो महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री.संजय खैरनार यांच्यावर ५३ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. “आगामी काळात जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देता समाजोपयोगी कामांसाठी सदैव कटिबद्ध राहिल,” अशी ग्वाही बाबासाहेब संजय खैरनार यांनी दिली.

