1 min read

अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न..
पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान,
सामान्य ज्ञान परीक्षेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

Loading

अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न..

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान,

सामान्य ज्ञान परीक्षेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखा च्या वतीने काल नुकतीच सहविचार संपन्न झाली. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबर हिंदी दिनाच्या औचित्य साधून तालुकास्तरी हिंदी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवून परीक्षा यशस्वी केली. त्यात हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की परीक्षा यशस्वी करणाऱ्या सर्व हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे आभार मानत हिंदी अध्यापक मंडळ दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यात एक वेगळी छाप निर्माण केली आहे याचे सर्व श्रेय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जाते असे सांगितले…
अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक व मंडळाचे सचिव दिलीप पाटील होते. सहविचार सभेत प्रास्ताविक मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार यांनी केले. परीक्षेतील सामान्य ज्ञान परीक्षेतील परीक्षेचा आढावा व फी मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर,हिंदी मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी,खजीनदार राजेंद्र पाटील,डॉ किरण निकम,
कमलाकर संदानशिव,सोपान भवरे, प्रदीप चौधरी,मुनाफ तडवी, ईश्वर महाजन,प्रशांत वंजारी, श्रीमती मंगला चव्हाण,प्रतिभा जाधव यांनी घेतला. सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल लवकरच घोषित केला जाईल यावरही चर्चा करण्यात आली..
मंगरूळ हायस्कूलचे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सर(राजु सर) उपाध्यक्ष पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरांची पतपेढी अंमळनेर यांना रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माजी आमदार शरद पाटील धुळे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्यामुळे हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी हिंदी मंडळाचे खजीनदार राजेंद्र पाटील यांचा सहपत्निक शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला…
शेवटी पुरस्कार्थी माझा आपण सहपत्निक सत्कार केल्यामुळे आभार राजेंद्र पाटील यांनी मानले. हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *