ध्येय्य व परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली – श्री.सुभाष जाधव
![]()
ध्येय्य व परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली – श्री.सुभाष जाधव
वसंतनगर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम———

पारोळा प्रतिनिधी —
आयुष्यात प्रत्येक क्षणाला व्यक्तीला संघर्ष करावा लागतो.आणि जे सहज मिळते ते जास्त वेळ किंवा जास्त दिवस टिकत नाही .यासाठी विद्यार्थ्यानी शालेय जीवनात ध्येय व परिश्रम याची जोड ठेवल्यास जीवनात यशाची गुरुकिल्ली आपल्याकडे खेचून आणता येते.असे प्रतिपादन वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी वसंतनगर ता.पारोळा येथील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते.
कै. देशमुख जाधव यांच्या पुण्यस्मरणार्थ आश्रम शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यात इयत्ता पहिली ते बारावी वर्गात चार गटात वक्तृत्व, निबंध, चित्रकला, पाककला, क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेत विजयी विध्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाला अभेराम जाधव, संतोष जाधव, गजमल जाधव, जवाहर जाधव, जगन जाधव, एकनाथ जाधव, केळकर जाधव, मधुकर जाधव, अनार जाधव,आत्माराम जाधव, विनोद जाधव, दरबार जाधव, शिवलाल जाधव, ताराचंद जाधव, राजाराम जाधव, बच्छराज जाधव, अशोक जाधव, किशोर जाधव, चेतन जाधव, रमेश जाधव,प्राचार्य जी.एस.पाटील, मुख्याध्यापक सोपान पाटील, एस जे भामरे यांची उपस्थिती होती.
श्री. जाधव पुढे म्हणाले वसंतनगर येथे शिक्षणाची सोय नसल्याने घरापासून लांब शिक्षणाला जाणे शक्य नव्हते. यामुळे कै. बापूसाहेब देशमुख जाधव यांनी गावात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याने पहिली ते बारावी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची सोय विध्यार्थ्याना झाली आहे. यामुळे शैक्षणिक सोय उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे कला गुणांना वाव मिळत आहे.
यावेळी विद्यार्थाना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शालेय साहीत्य आदी बक्षिसे देऊन ग़ौरविन्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील यांनी केले.

