1 min read

शिक्षक मतदार नोंदणी विषयक बैठकीत संदीप घोरपडे घेणार हरकत..

Loading

शिक्षक मतदार नोंदणी विषयक बैठकीत संदीप घोरपडे घेणार हरकत..

शिक्षक मतदार नोंदणी मध्ये पाचवी ते आठवीतील शिक्षक वंचित राहणार…..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
नगरपालिकेच्या सभागृहात नाशिक विभाग शिक्षक मतदार नोंदणी विषयी प्रांत साहेब महादेव खेडकर
तहसीलदार रूपेशकुमार सुराणा तसेच गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांचे समवेत शिक्षक मतदार नोंदणी विषयक बैठक पार पडली. यात पात्र मतदाराविषयी उल्लेख करताना 13 फेब्रुवारी 2013 चा जीआर समोर धरून इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षक हे प्राथमिक विभागाचे शिक्षक म्हणून गणले जातील तेव्हा मी स्वतः अशी हरकत घेतली की इयत्ता पाचवी ते दहावी वर्ग असलेली शाळा किंवा इयत्ता आठवी ते दहावी वर्ग असलेली शाळा किंवा इयत्ता आठवी ते बारावी वर्ग असलेली शाळा यांना माध्यमिक विद्यालय अशीच गणना आजपर्यंत करण्यात आलेली आहे मात्र अशा शाळांमधील इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षक जर प्राथमिक शिक्षक म्हणून वेगळे केले गेले तर आपल्या शिक्षक मतदार संघात जवळजवळ 80 टक्के शाळा या इयत्ता पाचवी ते दहावी असे आहेत त्यातील जवळजवळ निम्मे शिक्षक मतदान प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जातील या अन्यायाविरुद्ध आपणास आवाज उठवावाच लागेल त्याकरिता टिडी एफ संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संदीप घोरपडे यांनी सांगितले की शिक्षक लोकशाही आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते व कार्यवाह पगडाल सर यांना मी उद्याच आमंत्रित करतो व आपणास पत्र देऊन ही हरकत नोंदवितो त्याप्रमाणे आज आपल्याकडे नानासाहेब बोरस्ते व पगडाल सर येणार आहेत.
आपल्या मतदानाच्या हक्काला बाधा पोहोचू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी नानासाहेब बोरसे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यासाठी मुख्याध्यापक ,शिक्षक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजर राहावे अशी विनंती संदीप घोरपडे
कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य टिडीएफ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *