के.बी. एल हायस्कूल बदलापूर येथे “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” यशस्वीरित्या संपन्न
![]()



के.बी. एल हायस्कूल बदलापूर येथे “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” यशस्वीरित्या संपन्न
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंती निमित्त “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” साजरा करण्यासाठी आज शाळे मध्ये स्काऊट गाईडच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य बसंतकुमार यादव , ट्रस्टी आशिष कुमार यादव गाईड शिक्षिका सौ. माया नागरे, स्काऊट मास्टर कु .संदीप यादव आणी सर्व सहकारी शिक्षकवृंद तसेच शाळेचे विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला. सर्वप्रथम विद्येची देवता
सरस्वती माता व महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यानंतर स्काऊट गाईड प्रार्थना म्हणून, कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी. स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. व त्या माध्यमातून सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे “रघुपति राघव राजाराम ” हया गांधीजीं च्या आवडत्या भजनाचे सामूहिक पणे गायन करण्यात आले, तसेच मुलांकडून शाळेच्या परिसरात काही रोपे लावण्यात आली .गांधीजींच्या जीवन कार्याविषयी मुलांनी माहिती सांगितली.तसेच विद्यार्थ्यांनी गांधीजींची वेशभूषा करून अगदी उस्फूर्तपणे. कार्यक्रमात सहभाग घेतला. अशा प्रकारे अगदी नियोजनबद्ध व शिस्तप्रिय रीतीने “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” यशस्वीरित्या संपन्न झाला.

