1 min read

जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी
अमळनेर जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट

Loading

जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी
अमळनेर जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट

शासनामार्फत पुरविण्यात
आलेल्या योजनांची माहिती घेतली जाणून….

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिल्हा परिषद प्राथमिक जवखेडे ता.अमळनेर येथे मा.श्री. गायधनी सो.जिल्हा व सत्र न्यायाधीश सो.अमळनेर यांनी शासनामार्फत पुरविण्यात येणारे शालेय योजनांच्या लाभांची माहिती, शालेय आवाराची स्वच्छता, मुलामुलींचे शौचालय, विद्युतीकरण, वर्ग खोल्यांची स्वच्छता, तसेच शालेय गुणवत्तेविषयी माहीती घेतली.व समाधान व्यक्त केले.तसेच उपक्रमशील शिक्षक छगन पाटील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. यावेळी अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री.रावसाहेब मांगो पाटील, जिल्हा व सत्र न्यायालयाचे श्री. सुनिल पाटील, ढेकु केंद्रांचे केंद्रप्रमुख मा.श्री. दिलीप सोनवणे व इतर उपस्थित होते.
जिल्हा सत्र न्यायाधीश गायधनी साहेब यांनी विद्यार्थ्यांची व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मार्गदर्शन करत आनंददायी अध्यापन पद्धतीचा वापर करावा .विद्यार्थ्यांना बोलके करावे असे सांगत शासनाच्या योजना विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचवा असे सांगितले. अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी त्यांचं स्वागत करत सत्कार केला.
यावेळी मा.श्री.गायधनी सो.मुख्य न्यायाधीश सो.यांनी त्यांच्या शालेय बालपणाविषयीच्या जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी सर्व शिक्षक भगिनी उपस्थित होते. शेवटी श्री. मुकेश पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *