1 min read

मंत्री अनिल पाटील नंदुरबारचे पालकमंत्री——-

Loading

अनिल पाटील नंदुरबारचे पालकमंत्री——-

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
भाजप- शिवसेनेच्या सत्तेत सोबत आलेल्या अजित पवार यांच्या गटातील अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता त्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांची वणीं लागली आहे. नंदुरबारचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेले आहे. राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पद आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडत एकमेकांना पेढा भरवत आनंद साजरा केला.

मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद आल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी वातावरण आहे. पाटील यांना पालकमंत्री पद आल्याने जिल्ह्याचा विकासाचा गती अजून वेगवान होईल; असा आशावाद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *