1 min read

शासकीय दवाखान्यामध्ये औषधांअभावी रुग्णांचा झालेला मृत्युबद्दल शासनाचा निषेध

Loading

शासकीय दवाखान्यामध्ये औषधांअभावी रुग्णांचा झालेला मृत्युबद्दल शासनाचा निषेध

किसान काँग्रेस अमळनेर यांचे
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
नांदेड, छत्रपती संभाजी नगर,
ठाणे येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे एकाच दिवशी 24 रुग्ण दगावत आहेत. त्यात निम्मे संख्या ही नवजात शिशुंची आहे. ही विकसीत असलेल्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी बाब आहे. सरकारी धोरण हे खाजगी आरोग्य क्षेत्राचा धंदा वाढावा किंवा सरकारी दवाखान्यांचे खाजगी करन करावे असेच असल्यामुळे सरकारी
दवाखान्यात येणा -या गरीबांना औषध पुरवठा जाणीव पुर्वक टाळला जात आहे नोकर भरती मुद्दाम केली जात नाही चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची नोकर भरती केली जात नाही तसेच डॉक्टरांची देखील भरती केली जात नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तरी
गरीबांच्या आरोग्याशी, जिवांशी खेळणा-या शासनाचा आम्ही धिक्कार करीत आहोत. तरी शासनास विनंती की, तात्काळ वरील प्रमाणे कार्यवाही आपले स्तरावरुन करावी ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व राष्ट्रीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश किरण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर अनिल शिंदे,संचालक सुभाष सुकलाल पाटील, प्रवीण पाटील प्राध्यापक श्याम पवार, धनगर दला पाटील ,जयवंत मन्साराम पाटील ,बी.के सूर्यवंशी,सेवानिवृत्त केद्रप्रमुख भागवत गुरुजी,ओबीसी संघटनेचे डी डी पाटील, मयूर पाटील, जी एम पवार, निळकंठ पाटील, प्रताप पाटील,प्रभाकर पाटील
किसानकॉग्रेस अमळनेर जि. जळगांव यांंनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *