आमदार सत्यजित तांबे यांच्या सहकार्याने शिक्षक नेते एस डी भिरुड यांच्या मार्गदर्शनाने पल्लवी चौधरी यांचे वैद्यकीय बिल मंजूर
![]()

आमदार सत्यजित तांबे यांच्या सहकार्याने शिक्षक नेते एस डी भिरुड यांच्या मार्गदर्शनाने पल्लवी चौधरी यांचे वैद्यकीय बिल मंजूर
स्व वीरेंद्र सुभाष चौधरी कनिष्ठ लिपिक सौ डी आर चौधरी माध्यमिक विद्यालय निंभोरा ता रावेर जि जळगाव सहयोग क्रिटिकल सेंटर जळगाव दि 08/01/ 2019 तसेच नानावटी हॉस्पिटल विलेपार्ले मुंबई येथे 12/01/ 2019 ते 24 /01/ 2019 या कालावधीत ॲडमिट होते.दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पत्नी पल्लवी वीरेंद्र चौधरी उपशिक्षिका अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ जि जळगाव यांनी अतिशय कठीण परिस्थितीत दोघेही दवाखान्यांचा एकूण 18,70, 459 औषधोपचार व इतर देय बाबींवरील खर्च केला त्यापैकी एकूण 17,34,717 रुपये( सतरा लाख चौतीस हजार सातशे सतरा रुपये मात्र) शासनस्तरावर मंजूर झाले. त्यांच्या या वैद्यकीय बिलाच्या मंजुरी मध्ये नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे साहेब व नवनिर्वाचित आमदार सत्यजितदादा तांबे यांनी मंत्रालय स्तरावर त्यांचे स्वीय सहाय्यक दीपक दराडे, महेश दिघे व प्रवीण कहांडळ यांच्या मदतीने मंजुरी मिळवून दिली. जिल्हास्तरावर व शिक्षण उपसंचालक स्तरावर जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष आदरणीय श्री एस डी भिरुड सर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव, शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव, शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथून बिल मंजुरीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सहकार्य केले. वैद्यकीय बिल तयार करत असताना सौ डी आर चौधरी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सायराबानो तबीबखान संस्थेचे चेअरमन कै ईश्वरसेठ चौधरी, अजित पाटील लिपीक घ का विद्यालय आमोदा ता यावल व शैलेश राणे संचालक जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढी या सर्वांनी सहकार्य केले. मंत्रालय स्तरावरून सदर बिल मंजूर झाल्यानंतर जळगाव जिल्हा परिषद येथून प्रत्यक्ष त्यांच्या घरी जळगाव माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष श्री एस डी भिरुड , संचालक जळगाव माध्यमिक पतपेढी शैलेश राणे ,जयंत चौधरी तालुकाध्यक्ष यावल तालुका मुख्याध्यापक संघटना , प्रा जे डी महंत ज्युनिअर कॉलेज संघटना रावेर ,किरण झांबरे तालुकाध्यक्ष यावल तालुका माध्यमिक संघटना , जयदीप फेगडे टीडीएफ कार्यकर्ते, अरुण सपकाळे सचिव जळगाव जिल्हा कलाध्यापक संघटना, हेमंत चौधरी संचालक जळगाव माध्यमिक पतपेढी ,युवराज पाटील विज्ञान शिक्षक जळगाव खुर्द , भारंबे साहेब सामाजिक कार्यकर्ते , शैलेंद्र महाजन संचालक भुसावळ माध्यमिक पतपेढी उपस्थित होते
वैद्यकीय बिल मंजुरीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री बी जे पाटील , जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाणसाहेब सिविल हॉस्पिटल मधील लिपिक मोहन पाटील शिक्षण उपसंचालक डॉ बी बी चव्हाण साहेब , शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शेखर पाटील व मंत्रालयातील अधिकारी वर्ग या सर्वांचं सहकार्य लाभले.

