1 min read

आर्मी स्कूल मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

Loading

आर्मी स्कूल मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा देणारे लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते.तर शरद पाटील प्रमुख वक्ते होते.प्रमुख अतिथी म्हणून बी.डी.पाटील होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन्हीही महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांनी माल्यार्पण केले.शाळेतील काही विद्यार्थ्यांनी या दोन महान विभूतींवर मनोगते व्यक्त केली.प्रमुख वक्ते शरद पाटील यांनी लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना सांगितले की, ‘ स्वातंत्र्य लढ्यातील अशा महान व्यक्तींची नावे आपणास माहिती असतात. परंतु त्यांची जीवनशैली आणि त्यांची विचारसरणी जाणून घेणे महत्त्वाचे असते.’ त्यानंतर अध्यक्षीय भाषणात पी. एम.कोळी म्हणाले की, ‘लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधीजींच्या विचारांचा अवलंब विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे विद्यार्थी ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. तर आभार निखिल पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *