1 min read

पुष्पराज वाघ याने रायफल शूटिंग एयर पिस्टल या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला व त्याची निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा रायफल असोसिएशन तर्फे त्याचा सत्कार

Loading

दि.०१/१०/२३ रोजी संपन्न झालेल्या जळगांव जिल्हा रायफल असोसिएशन, जळगांवच्या सहकार्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव आणि जळगांव शहर महानगर पालीका यांच्या संयुक्त विद्यमाने.पायोनियर स्पोर्ट्स क्लब,जळगाव येथे घेण्यात आलेल्या
जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटींग स्पर्धेत आपल्या विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळेत इ.९ वी स्वरस्वती मधील विद्यार्थी चि. पुष्पराज नारायण वाघ याने रायफल शूटिंग एयर पिस्टल या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला व त्याची निवड नाशिक येथे होणाऱ्या शालेय विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता झाली आहे.व वेस्ट बंगाल येथे झालेल्या ऑल इंडिया रायफल शूटिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल जळगाव जिल्हा रायफल असोसिएशन तर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. विजयी खेळाडूचे मा.मुख्याध्यापक श्री.हेमराज पाटील सर , विवेकानंद प्रतिष्ठान प्रशासन अधिकारी श्री.दिनेश ठाकरे सर, समन्वयिका सौ.वैशाली पाटील दिदी, सौ.जयश्री वनडोळे दिदी, क्रीडा शिक्षक श्री.संतोष वाळसे व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे तसेच पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *