ग्रामपंचायत दहिवद ता. अमळनेर येथील विकास कामाचा उदघाटन सोहळा आज संपन्न झाला..
![]()

ग्रामपंचायत दहिवद ता. अंमळनेर येथील विकास कामाचा उदघाटन सोहळा आज संपन्न झाला..
मराठी लाईव्ह न्यूज प्रतिनिधी भूषण महाजन
दि.2/10/2023 रोजी दहिवद ग्रामपंचायत मार्फत विविध विकास कामाचा उदघाट्न सोहळा सपन्न झाला.. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विनोद पाटील (झी 24 तास सिनियर प्रोडूसर हे होते) कार्यक्रमाचे उदघाट्क श्री. दिनेशजी सुरेश पाटील (भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली भारत सरकार कृषी मंत्रालय)हे होते कार्यक्रमाची सुरवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत दहिवद विकास कामाचे उदघाटन सोहळा…!
25 शिलाई मशीन वाटप ग्रामपंचायत मार्फत व प्रविण आबा मित्रपरिवारा मार्फत 5 असे 30 शिलाई मशीन लाभार्थी ना वाटप करण्यात आले..
अनु. जाती जमाती साठी सार्वजनिक भांडे..
डझबीन वाटप 800..
जिल्हा परिषद शाळेत शौचालय..
जिल्हा परिषद शाळेत खेळणी साहित्य..
बाला अंतर्गत डिजिटल काम…
सार्वजनिक शौचालय स्वच्छ भारत अभियान अंतर्गत…
अश्या कामाची उदघाटन व भूमिपूजन करण्यात आले…
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री. आनंद लोंढे ASP महाराष्ट्र कार्यअध्यक्ष धुळे, श्री विद्याधर पाटील धुळे प. स. उपसभापती, श्री. प्रवीण काशिनाथ माळी माजी उपसरपंच पॅनल प्रमुख दहिवद, श्री.जयवंत गुलाबराव पाटील चेअरमन दहिवद पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, श्री. सुभाष देसले माजी उपसभापती प.स. अंमळनेर,श्री. किरण गायकवाड समता संघ धुळे जिल्हा अध्यक्ष,श्री. दत्तात्रय किसन पाटील (व्हा. चेअरमन न. भा. माध्यमिक विद्यालय ), सौ.अल्का संजय पाटील (चेअरमन दहिवद विकास सोसायटी)
श्री. ईश्वर गिरधर माळी (माजी चेअरमन द.वि.सोसायटी)श्री. गोकुळ गबा माळी सकल्प बचत गट अध्यक्ष,प्रा.श्री.किरण माळी सर ikd,प्रा.श्री. रामेश्वर बहारे मानवता बहुदेशीय संस्था धुळे,
श्री. राजेंद्र पांडुरंग देसले सामाजिक कार्यकर्ते ,श्री. सुभाष हिम्मत भदाणे सचिव न भा माध्यमिक विद्यालय, दहिवद श्रीमती.यशोदा मालचे नाशिक, सौ. प्रतिभा सुभाष देसले पोलीस पाटील दहिवद,श्री.अनिल भटा माळी अध्यक्ष व्यवस्थापन समिती जि.प.केंद्र शाळा दहिवद, श्री. साखरलाल नारायण माळी माजी ग्रा.पं.सदस्य,श्री.शिवाजी काशिनाथ माळी उपाध्यक्ष क्षत्रिय माळी समाज,श्री.भटू नथ्थू पाटील माजी चेअरमन दहिवद विकास सोसायटी, श्री.सुकलाल काळू पारधी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच श्री. देवानंद बहारे, श्री. बाळू आत्माराम पाटील सदस्य ग्रा. पं, श्री. रवींद्र माळी ग्रा. पं. सदस्य, सौ वर्षा पाटील ग्रा.पं सदस्य, सौ मळलूबाई माळी ग्रा. पं. सदस्य, श्रीमती हिराबाई धुडकर ग्रा. पं. सदस्य, सौ आशाबाई माळी ग्रा. पं. सदस्य, सौ. वैशाली माळी ग्रा. पं. सदस्य, श्री. शेखर धनगर ग्रा वि अधिकारी व गावातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या सख्येने उपस्थित होते. यापुढेही दहिवद ग्रामपंचायतच्या वतीने अशाच पद्धतीने गावाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी सर्वत्र प्रयत्न केला जाईल..
कार्यक्रमाचे प्रस्तविक शिवाजी पारधी ग्रा.पं.सदस्य यांनी केलं, सूत्रसंचालन श्री. जिजाबराव माळी आभार श्री. अनिल माळी माजी उपसरपंच यांनी मानले….

