1 min read

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कल्याण पूर्व मध्ये भव्य सायकल रॅली संपन्न.

Loading

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कल्याण पूर्व मध्ये भव्य सायकल रॅली संपन्न.

ठाणे,( मनिलाल शिंपी):कल्याण कल्याण भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व 142 मतदार संघ, तसेच कल्याण पूर्व सायकलिस्ट क्लब यांच्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते ..
या रॅलीमध्ये कल्याण पूर्व मधील महिला मुली मुले आणि पुरुष यांच्याबरोबरच कल्याण पूर्वचे आमदार श्री गणपत शेठ गायकवाड कल्याण जिल्हा भाजपाचे अध्यक्ष श्री नरेंद्र सूर्यवंशी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अभिमन्यू गायकवाड तसेच दीपक शेठ गायकवाड रवीशेठ गायकवाड गुड्डू खान यांनी सायकलिंग खेळाडूंबरोबर सायकल चालवत सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवला..
क्षयरोग या जागतिक समाजाचे कल्याण पूर्व मधील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रमुख उद्देश या रॅलीचा होता.. रॅली दिसाया हाऊस या कार्यालयापासून सुरू होऊन तिसगाव नाका मसोबा चौक छत्रपती शिवाजी कॉलनी विजयनगर आमराई चिंचपाडा कोळशेवाडी सिद्धार्थ नगर म्हसोबा चौक तिसगाव नाका अशा मार्गाने जात नागरिकांमध्ये जनजागृती संदेश दिला… या रॅलीसाठी हिरकणी सायकल ग्रुप, कल्याण पूर्व सायकलिस्ट क्लब, कल्याण पूर्व क्रीडा शिक्षक संघटक प्रविण खाडे, नलावडे सर, गायकवाड सर, आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांनी मोलाचे सहकार्य केले.या सायकलिंग रॅली चे संपुर्ण नियोजन आणि आयोजन, सूत्रसंचलन उत्कृष्टपणे करणारे क्रीडा संघटक अविनाश ओंबासे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *