नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनाने व लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद यांच्या मध्यस्थीने उपोषणाला स्थगिती
![]()

नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनाने व लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद यांच्या मध्यस्थीने उपोषणाला स्थगिती
सानेनगर अमळनेर येथील आदिवासी पारधी समाजाचे वयोवृद्ध मधुकर चव्हाण यांच्या घरासमोर बेकायदेशीर अतिक्रमण असल्याने मधुकर चव्हाण यांनी दिनांक. २७/७/२०२३ रोजी नगरपरिषदेला विनंती पत्र दिले होते, सदर विनंती पत्र देऊन हि पालिकेने कुठलीही कारवाई न केल्याने मधुकर चव्हाण यांनी दिनांक १८/८/२०२३ रोजी घरासमोरील अतिक्रमण काढावे अन्यथा २ ऑक्टोबर २०२३ पासून उपोषणाचा लेखी इशारा दिला होता, परंतु सदरच्या पत्राकडे पालीका प्रशासनाने दुर्लक्ष करत अतिक्रमण धारक व तक्रारदार यांना कुठलाही पत्रव्यवहार व कुठलीही कारवाई न केल्याने तक्रारदारास न्याय न मिळाल्याने तक्रारदार मधुकर चव्हाण उपोषणाला बसले पालीका प्रशासनाला आजच्या उपोषणा बाबत काहिच माहिती नसल्याने लोक संघर्ष मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर साहेबांशी संपर्क साधत सदर विषयाची माहिती दिली असता पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली व संध्याकाळ पर्यंत तक्रारदाराने पालीका कार्यालयात दिलेले पत्र शोधून पालिका प्रशासना तर्फे अभियंता वाघ साहेब यांनी उपोषणकर्ता सह लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या पदाधिकारीं सोबत चर्चा करून पंधरा दिवसांत अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी आश्वासन उपोषणकर्ता मधुकर चव्हाण सह लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेला दिले या वेळी उपोषणकर्ते मधुकर चव्हाण यांना पाठिंबा देण्यासाठी लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे, पन्नालाल मावळे सह पि.पी. चव्हाण सर, नाना चव्हाण, मनोज पवार, प्रकाश सोनवणे, संदिप पारधी, भाईदास सोनवणे, आप्पा दाभाडे, भुरा पारधी, संजय सोनवणे, राजु चव्हाण, सह समाज बांधव हजर होते.

