वादळी पावसामुळे झालेल्या
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना
बाजार समितीकडून मदतीचा हात!
कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या स्तुत्य उपक्रमांना
माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा – कपिल पाटील
![]()

.वादळी पावसामुळे झालेल्या
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना
बाजार समितीकडून मदतीचा हात!
कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या स्तुत्य उपक्रमांना
माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा – कपिल पाटील
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) बुधवार दिनांक २७/०९/२०२३ रोजी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मोरणी गावचे शेतकरी श्री.बळीराम गणपत शिंदे यांच्या पोल्ट्री फॉर्मची संपूर्ण शेड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,तसेच मु .पाचगाव पोस्ट चिंचवली येथील गरीब शेतकरी कै.विलास सदाशिव मुसळे यांचे नदीच्या पाण्यात बुडून झालेल्या दुर्घटनेत निधन होउन त्यांचें कुटुंबीयांची मोठी हानी झाली असल्याने व दोन्ही व्यक्ती गरीब शेतकरी कुटुंबातील असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या शनिवार दिनांक ३०/०९/२०२३ रोजीच्या मासिक सभेत त्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने समत झालेल्या ठरावानुसार बाजार समितीचे आकस्मिक निधीमधून अनुदान म्हणून श्री.बळीराम गणपत शिंदे यांना रक्कम रू.४९०००/- आणि कै .विलास सदाशिव मुसळे यांच्या पत्नी श्रीमती छाया विलास मुसळे यांना रक्कम रू.२५०००/- अशाप्रकारे सोमवार दि.०२/१०/२०२३ रोजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार मा.ना.श्री.कपिल मोरेश्वर पाटील यांच्या शुभहस्ते मदतनिधीचे धनादेश प्रदान करण्यात आले.सदर प्रसंगी बाजार समितीचे सभापती श्री . सचिन पाटील, उपसभापती श्री. मनेष वसंत म्हात्रे, तसेच संचालक श्री. अनंता पाटील, विष्णू पाटील, सुरेश कोलपे,मोहन गणपत म्हणेरा, सचिव डॉ. श्री. यशवंत अनंत म्हात्रे, तसेच पंचायत समितीचे माजी सभापती श्री शांताराम पाटील उपस्थित होते. यावेळी मा. मंत्री श्री. कपिल मोरेश्वर पाटील यांनी भिवंडी बाजार समिती करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यात अशाचप्रकारे नैसर्गिक आपत्ती तसेच आकस्मिक दुर्घटनेत पिडीत झालेल्या गरीब शेतकरी कुटंबातील व्यक्तींना मदतनिधी मिळवून देण्यासाठी धोरण तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कार्य करावे अशा प्रकारच्या सूचना करून सर्वांचे कौतुक केले.

