1 min read

शिरपूर येथे स्टेअर्स फाऊंडेशन तर्फेजिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा संपन्न

Loading

शिरपूर येथे स्टेअर्स फाऊंडेशन तर्फेजिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा संपन्न

शिरपूर- भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाऊंडेशनतर्फे धुळे जिल्हास्तरीय मुला-मुलींचे फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेला शिरपुर येथील क्रीडा संकुलात आज प्रारंभ झाला. शिरपुर विभागाचे डी.वाय.एस.पी. सचिन हिरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाना सैंदाणे, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष गो.पि. लांडगे, तालीम संघाचे उपाध्यक्ष दिलीप आप्पा लोहार, मांडळचे माजी सरपंच भटूभाऊ माळी, शिरपूर कुस्तीगिर परिषदेचे सचिव सुभाष निकुंभे, तालुका सचिव रावसाहेब चव्हाण सर, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, रविंद्रआप्पा माळी, लाला चौधरी पैलवान, पंच शाम कानडे पैलवान, पंच गणेश फुलपगारे पैलवान आदी मान्यवर उपस्थित होते. सुभाष नगर, जुने धुळे येथील रामदास व्यायाम शाळेचा मल्ल यश दिपक सांगळे याने कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 41 किलो वजन गटात विजयी होत गदा प्राप्त केल्याबद्दल त्याचा ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे व मल्ल चंद्रकांत नाना सैंदाणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिरपूर येथील आजच्या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे स्टेअर्स फाऊंडेशनचे जिल्हा निरीक्षक वैभव भामरे यांनी नमूद केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तालुकाअध्यक्ष ईश्वर भदाणे व मल्ल पप्पू माळी आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील होते.


,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *