महावीर कॉलनी प्रवेशद्वाराजवळील घाणीच्या वृत्ताची महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून तात्काळ दखल
![]()


महावीर कॉलनी प्रवेशद्वाराजवळील घाणीच्या वृत्ताची महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून तात्काळ दखल
धुळे- येथील साक्री रोडवरील सप्तश्रृंगी मंदीरालगत असलेल्या महावीर कॉलनी प्रवेश द्वाराजवळ असलेल्या घाणी संदर्भात उपरोधित शब्दात धुळे महानगरपालिकेला आवाहन करण्यात आले होते. त्याची त्वरीत दखल घेत पालिकेचे मावळते उपायुक्त विजय सनेर, आरोग्य निरीक्षक रुपेश पवार, मुकादम संदीप वाघ यांनी त्वरीत दखल घेऊन गटारीवरचे आच्छादन बाजूला करून अडखळत का होईना गटार पाण्याला थोडी-थोडी वाट मोकळी करून दिली व स्वच्छता राबविली. त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे व महावीर कॉलनी परिसरातील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच महावीर कॉलनीचे सदस्य व हॉटेल उद्योजक सुभाष राजपूत या कर्तव्यदक्ष तरुणाने आपली काठियावाडी टीम सोबत घेऊन वृक्षांच्या लोंबकळणाऱ्या तोरणसदृष्य फांद्या दूर करून खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान राबविले. त्या दिवशी सुभाष राजपूत या तरुणास साक्षात कॉलनी वासियांनी स्वच्छता अभियानाचे जनक संत गाडगे बाबांच्या स्वरुपात पाहिले. सुभाष राजपूत आणि त्यांच्या टीमचेही कॉलनी वासियांनी कौतुक केले.

