स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत महावीर चौक अंजुर फाटा येथे स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न!
![]()


स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत महावीर चौक अंजुर फाटा येथे स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न!
ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी शहरातील अभिनव हायस्कूल कामतघर ,हालारी विशा ओसवाल हायस्कूल अंजुर फाटा, राधाकृष्ण इंग्रजी हायस्कूल शिवराम नगर कामतघर व शेतकरी उन्नती मंडळ हायस्कूल कोपर यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त श्री अजय वैद्य यांच्या खास उपस्थितीत स्वच्छता मोहीम सोमवार दिनांक २/१०/२०२३ रोजी राबविण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी समाजसेविका सत्वशीला जाधव, शिक्षक वर्ग आर एल् यादव, प्रिता नायर ,सीमा यादव ,पुनम जयस्वार, राजेश विश्वकर्मा श्रीमती जोशी श्री अखिल श्री राहुल सर्व शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे भिवंडी मनपाच्या आयुक्तांनी सर्व शाळांचे आभार व्यक्त केले.

