1 min read

प्रताप महाविद्यालयाचा रायफल व पिस्तूल शूटिंग संघ विजयी

Loading

प्रताप महाविद्यालयाचा रायफल व पिस्तूल शूटिंग संघ विजयी

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयामध्ये दि.२९ सप्टेंबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आंतर महाविद्यालयीन रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धा संपन्न झाल्या यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलं आणि मुली या दोन्ही संघांनी विजय मिळवले. या कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, सहसचिव डॉ. धीरज वैष्णव, सर्व उप प्राचार्य, जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. संदीप नेरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू मित्रमंडळी या सर्वांनी विजयी संघांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे नियोजन प्रा. डॉ. सचिन पाटील प्रा.अमृत अग्रवाल प्रा. अर्चना पाटील, जगदीश शिंगाणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *