1 min read

प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी

Loading

प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी जळगाव येथील रायसोनी महाविद्यालयातर्फे झालेल्या राष्ट्रीय आयटी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुयश मिळवले.
प्रशांत शांताराम पाटील ह्यास प्रथम पारितोषिक मिळाले. रुपये दोन हजार रोख व Drone Application course प्रशिक्षणासाठी रुपये पन्नास हजार आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. सदर स्पर्धेत महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थी स्वप्नील सुतार, ललित चौधरी, आर्यन विंचूरकर, दीपक पाटील, प्रशांत पाटील, जयेश सोनावणे, लीना शिरसाठ, साक्षी पाटील, हेमंत गायकवाड, राखी पाटील, जुनेरा शेख, प्रियांका पाटील यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला व स्पर्धेतील शेवटच्या फेरीपर्यंत मजल मारीत सर्वोत्कृष्ट कामगिरीचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. डॉ. जे. बी पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, यांनी विजयी विद्यार्थ्यांचे व संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व सहकारी प्राध्यापकांचे कौतुक केले. सर्व स्पर्धकांना विभाग प्रमुख प्रा पुष्पा पाटील, प्रा. अमित शिंदे, प्रा. नेहा आगलावे, प्रा. किरण बोरसे, प्रा. रुपाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *