1 min read

प्रताप महाविद्यालय तायक्वान्डो स्पर्धेत प्रथम

Loading

प्रताप महाविद्यालय तायक्वान्डो स्पर्धेत प्रथम

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयामध्ये दि.३० सप्टेंबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आंतर महाविद्यालयीन तायक्वान्डो स्पर्धा प्रताप महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये संपन्न झाल्या. यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलं आणि मुली या दोन्ही संघांनी विजय मिळवले उपप्राचार्य प्रा. पराग पाटील यांनी उदघाटन केले. याप्रसंगी एरंडोल विभागीय सचिव डॉ. विजय पाटील, डॉ. शैलेश पाटील, डॉ. देवदत्त पाटील, डॉ. सचिन पाटील (वरिष्ठ क्रीडा संचालक ), प्रा. अमृत अग्रवाल, प्रा. अर्चना पाटील, श्री. सचिन वाघ, उपस्थित होते. या कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. अरुण जैन, सहसचिव डॉ. धीरज वैष्णव, सर्व उप प्राचार्य, जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. संदीप नेरकर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू मित्रमंडळी या सर्वांनी विजयी संघाचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे नियोजन प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा.अमृत अग्रवाल प्रा. अर्चना सचिन पाटील, सचिन वाघ, जगदीश शिंगणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *