ज्येष्ठ नागरिक संघ अमरावती यांच्याकडून डॉ उज्जैनकर यांचा सत्कार
![]()

ज्येष्ठ नागरिक संघ अमरावती यांच्याकडून डॉ उज्जैनकर यांचा सत्कार
आज दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोज रविवारला अंतर राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त व्ही. एम. व्हि.परिसर येथील श्री संत गाडगेबाबा प्रार्थना सभागृह, अमरावती येथे श्री संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभे प्रसंगी या मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष डॉ.सतीश तराळ यांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्याबद्दल त्यांचा शाल व गुलाब बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री वासुदेवराव उमाळे माजी मंत्री तथा जेष्ठ नागरिक श्री सुरेंद्र भुयार श्री राजेंद्रसिंग राजपूत पुष्पाताई बोंडे प्रा. खोपे फाउंडेशनचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री गजानन ईटणारे राज्य संघटक प्रा. आनंद महाजन आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे असंख्य ज्येष्ठ नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. उज्जैनकर यांनी श्री गजानन इटणारे ,प्रा. आनंद महाजन डॉ. हेमलता नांदुरकर यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट दिली.

